बारावीनंतर अभियांत्रिकी आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश घेण्यासाठी महत्त्वाच्या ‘नीट’, ‘एमएच सीईटी’, ‘आयआयटीसाठी जेईई’, ‘एआयआयएमएस’ परीक्षांना सामोरे जाताना अभ्यास कसा करावा, याबद्दल अलेन करिअर इन्स्टिटय़ूटच्या २०१६ मधून ‘आयआयटी जेईई’ आणि ‘एआयआयएमएस’मधून संस्थेच्या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी वाशी येथील सिडको प्रदर्शन केंद्रात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन केले. ‘अलेन ब्रिलियन्स’च्या वतीने हा कार्यक्रम झाला. ‘आयआयटी जेईई’मधील अमोल बन्सल, भावेश धिंग्रा, कुणाल गोयल, गौरव दिदवानिया आणि ‘एआयआयएमएस’च्या निखिल भाजा, ऐश्वर्य गुप्ता, हित शहा, मोरवल शर्मा या प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनी वैद्यकीय आणि अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेणाऱ्या इच्छुकांना मार्गदर्शन केले.
या वेळी ‘अलेन करिअर इन्स्टिटयूट’चे संचालक ब्रिजेश महेश्वरी संस्थेच्या २८ वर्षांच्या वाटचालीविषयी माहिती दिली. सुवर्णमहोत्सवी वर्षांत आयआयटी वा ‘नीट’च्या कोणत्याही परीक्षेत ‘अलेन करिअर इन्स्टिटय़ूट’चे विद्यार्थी सरस ठरतील, असा विश्वास व्यक्त केला. प्रत्येकाने आयुष्यभर विद्यार्थी म्हणूनच राहण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. कायम आनंदी आणि कामावर निष्ठा ठेवण्याची गरज आहे. गायनाच्या माध्यमातून गोविंद महेश्वरी यांनी विद्यार्थी आणि पालकांना संस्कार व जीवन याबद्दल बहुमोल मागदर्शन केले. या वेळी संस्थेचे बिपीन योगी, प्रदीप मिश्रा, अमित ठाकूर उपस्थित होते. कार्यक्रमाला दहा हजार विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

‘एकटेच नको, गटाने अभ्यास करा’
’ विद्यार्थ्यांनी समाजमाध्यमांपासून दूर राहायला हवे. याच वेळी या सर्वापासून दूर जाताना एकटे पडणे योग्य नाही. अभ्यासात मात्र समूह महत्त्वाचा ठरतो. एकटय़ाने अभ्यास केल्याने बरीच माहिती, संदर्भ राहून जातात. अशी माहिती गटागटाने अभ्यास केल्याने अधिक विस्ताराने आणि प्रभावी रीतीने कळण्यास मदत होते. असा गटागटाने अभ्यास करणे कधीही चांगले.
’ खासगी शिकवण्या आणि महाविद्यालयातील परीक्षांमध्ये दुसऱ्याला मिळणाऱ्या गुणांपेक्षा स्वत:च्या गुणांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. अभ्यासात वा परीक्षेत कुठे कमी पडतो, याचा अंदाज येतो. अभ्यास करताना शिस्त महत्त्वाची आहे. तो शक्यतो खुर्चीत बसूनच करावा. झोपून वा रेलून अभ्यास करणे टाळावे, शिकवणी वर्गातील अभ्यास घरी पूर्ण करावा.
’ प्रथम जे प्रश्न सोडवता येतात, त्यावर भर देणे आवश्यक आहे. जे येत नाहीत, त्यात वेळ दवडू नका ‘नीट’ला सोमोरे जाताना ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकांचा अभ्यास करा.