एक दिवसात लससाठा संपला

नवी मुंबई महापालिकेला बुधवारी मिळालेल्या दहा हजार लस कुप्यांपैकी गुरुवारी एक दिवसातच ८८७६ कुप्या संपल्या असल्याने शहरात पुन्हा लस तुटवडा निर्माण झाला आहे.

आज फक्त पालिकेच्या तीन रुग्णालयांत कोव्हॅक्सिनची दुसरी मात्रा

नवी मुंबई :  नवी मुंबई महापालिकेला बुधवारी मिळालेल्या दहा हजार लस कुप्यांपैकी गुरुवारी एक दिवसातच ८८७६ कुप्या संपल्या असल्याने शहरात पुन्हा लस तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शुक्रवारी पालिकेच्या तीन रुग्णालयांत फक्त कॉव्हॅक्सिनची दुसरी मात्रा देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

गुरुवारी शहरातील ९० केंद्रांवर महापालिकेने लसीकरण केले. तिसऱ्या लाटेच्या भीतीने नागरिकांना लस हवी आहे. पण शासनाकडून सातत्याने कमी लस मिळत असल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. मागील आठवडय़ात २९ जुलैनंतर बुधवारी दोन्ही लशींच्या दहा हजारा मात्रा मिळाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी महापालिकेने दोन्ही मात्रांचे ९० केंद्रांवर लसीकरण केले, असे महापालिकेच्या लसीकरणप्रमुख रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.

गुरुवारचे लसीकरण

कोविशिल्ड : ४९४०

कोव्हॅक्सीन : ३९३६

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नवी मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Corona virus corona vaccine vaccination navi mumbai ssh

ताज्या बातम्या