महिनाभरात मोठी घट

Rising Temperatures, Rising Temperatures East Vidarbha Districts, Rising Temperatures Health Crisis, Rising Temperatures Surge in Patients, Surge in Patients East Vidarbha, Nagpur, Chandrapur, wardha, bhandara, gadchiroli, rising temperature news,
उन्हाच्या तडाख्यात शासकीय रुग्णालयात रुग्णांच्या रांगा, उष्माघात नव्हे…
Damage to crops on 82 thousand hectares due to hailstorm
गारपिटीमुळे ८२ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान, जाणून घ्या, जिल्हा, पिकनिहाय नुकसान
500 houses collapsed in two days due to unseasonal rain in Yavatmal woman died due to lightning
यवतमाळात अवकाळीने दाणदाण; दोन दिवसांत ५०० घरांची पडझड, वीज कोसळून महिलेचा मृत्यू, तिघे गंभीर
gudi padwa in Nagpur
नागपुरात गुढीपाडव्याला सुमारे १५० बालकांचा जन्म, मुलींचा टक्का अधिक

नवी मुंबई : महिनाभरापूर्वी नवी मुंबईत दैनंदिन २० पेक्षा कमी रुग्ण तर उपचाराधीन रुग्णांची संख्याही दोनशे पर्यंत खाली आली होती. मात्र महिनाभरात पुन्हा रुग्णवाढ सुरू होत गेल्या आठ दिवसात संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी रुग्ण दुपटीचा कालावधी सरासरी ३,७९० दिवस इतका होता तो घटून २६६ दिवसांवर आला आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा नवी मुंबई शहरात शिरकाव झाला होता. मे महिन्यात करोनारुग्ण दुपटीचा कालावधी हा ११ दिवसावरुन फक्त ६ दिवसांवर खाली आला होता. त्याचप्रमाणे पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असून १५ फेब्रुवारीपर्यंत रुग्णवाढीचा वेग असाच राहिल्यास शहरात दुसऱ्या लाटेपेक्षा चिंताजनक परिस्थिती निर्माण होणार आहे.

शहरातील करोनाचे नवे रुग्ण वाढत असून याबाबत पालिका प्रशासन सतर्क आहे. नागरिकांचे सहकार्य हेच आगामी काळात मोलाचे ठरणार आहे.  आरोग्यसुविधा पुन्हा एकदा खुल्या करण्यात येत आहेत. संसर्ग खूप मोठा असल्याने संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितल.

एकीकडे दैनंदिन रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. तसेच रुग्णवाढीचा कालावधीही वेगाने घटत असल्याने शहरावर करांनाचे मोठे संकट निर्माण होत आहे.

बायोमेट्रिक हजेरी धोकादायक

नवी मुंबईत करोना संसर्ग वाढत आहे. पालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीपद्धत लागू असून ती धोकादायक असून संसर्गाचे कारण ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे करोनाकाळापुरती बायोमेट्रिक हजेरी बंद  करण्याची मागणी नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष रवींद्र सावंत यांनी आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.