उरण: तालुक्यातील फुंडे, डोंगरी व पाणजे या तीन गावांना जोडणाऱ्या मार्गावरील खड्डयांना पावसामुळे तलावांचे स्वरूप आले आहे. याच मार्गातून दररोज येथील नागरिक व प्रवासी वाहने प्रवास करीत आहेत.
त्यामुळे हा रस्ता आहे की, तलाव मार्ग असा सवाल येथील प्रवाशांकडून केला जात आहे. उरण शहराला फुंडे, डोंगरी व पाणजे तसेच जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या मार्ग चिखलमय झाला असून त्याला धोकादायक खड्डे पडले आहेत. या निसरड्या मार्गावरून येथील विद्यार्थ्यांनाही प्रवास करावा लागत असल्याने धोका निर्माण झाला आहे.
उरण ते शेवा मार्गावरील वायु विद्युत केंद्र कामगार वसाहती नजीकच्या रस्त्याची खड्डे बुजवून तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र या मार्गाने प्रवासी वाहनांबरोबरच डम्पर सारख्या जड वाहनांची वाहतूक सुरू झाली. त्यामुळे या मार्गाला प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. त्यात पावसाळ्यात भर पडल्याने दीड ते दोन फुटांचे चिखलाने भरलेले धोकादायक खड्डे मार्गातून येथील नागरिक प्रवास करीत आहेत.