नवी मुंबई: मोबाईलसारखी वस्तू चोरी झाली आणि ती परत मिळाली अशी घटना क्वचित घडते. मात्र गेल्या काही दिवसांतील कारवाईमुळे कोपरखैरणे पोलिसांनी ५० मोबाईल जप्त केले असून हेच मोबाईल सोमवारी पोलीस उपायुक्त यांच्या हस्ते मूळ मालकांच्याकडे सुपुर्त करण्यात आले.

परिमंडळ एकचे पोलीस उप आयुक्त पंकज डहाणे यांनी कोपरखैरणे पोलीस क्षेत्रात नोंद असलेल्या चोरीस गेलेल्या व गहाळ मोबाईल फोनबाबत प्राप्त तक्रारींचा आढावा घेतला. मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. कोपरखैरणे पोलीस पथकाने पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेले व गहाळ झालेल्या मोबाईल फोनच्या तक्रारी पुनः तपासणे सुरू केले. 

हेही वाचा : नवी मुंबईत फ्लेमिंगो अधिवासाचा गळा घोटला जातोय का? सरकारी यंत्रणाच ऱ्हासास कारणीभूत?

मोबाईलचा तांत्रिक तपास करून भारतातील विविध राज्यांतून एकूण ५० मोबाईल फोन हस्तगत केलेले आहेत. याच मोबाईलचे मुळ मालकांना वाटप केले गेले. आज या ५० पैकी २८ मोबाईल मालक आले होते. त्यांना त्यांचे त्यांचे मोबाईल परत देण्यात आले. अशी माहिती पोलीस उपायुक्त पंकज डहाने यांनी दिली.