मुंबई कृषी उत्पन्न कांदा, बटाटा बाजार समितीत कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असून त्या प्रमाणात मालाला उठाव नसल्याने बाजारभाव उतरले आहेत. १३-१४ रुपये किलो दराने विकला जाणारा नवीन कांदा ८-१० रुपये किलोवर आलेला आहे.
हेही वाचा – नवी मुंबई : सीरियातील तरुणीशी मैत्री पडली महागात; वाचा नेमका काय आहे प्रकार?
हेही वाचा – नवी मुंबई पोलिसांसाठी सायबर क्राईम ट्रेनिंग प्रोग्रामचे आयोजन
एपीएमसी बाजारात डिसेंबर, जानेवारीत नवीन कांद्याची अधिक आवक होत असते. परंतु, अवकाळी पावसाने उत्पादनाला फटका बसला आहे. त्यामुळे जुना साठवणुकीचा कांदा भिजल्याने खराब झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर कांदा विक्रीसाठी बाहेर काढण्यात आला परिणामी बाजारात कांद्याचे आवक वाढल्याने दर गडगडले आहेत. सोमवारी बाजारात १८० गाड्या दाखल झाल्या. परंतु, पुरवठ्याच्या तुलनेत उठाव कमी असल्याने दरात घसरण पाहायला मिळत आहे. सध्या बाजारात सर्वात मोठ्या आकाराचा कांदा ९-११ रुपये किलो, तर एक आणि दोन नंबरचा कांदा ७-९ रुपये किलो आणि पाल्याचा कांदा ३ ते ४ रुपये किलोने विक्री होत आहे.