पीडित महिलेची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार; अटकेच्या भीतीने आरोपी फरार

ऐरोलीमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी धमकावून बलात्कार केल्याची तक्रार एका ४० वर्षीय महिलेने रबाळे पोलीस ठाण्यात केली आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून रबाळे पोलीस ठाण्यात विकासक असणाऱ्या तीन भावंडाच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. हे तिघे जण अटकेच्या भीतीने सध्या फरार आहेत. अजय मिश्रा, विजय मिश्रा आणि विनोद मिश्रा अशी दाखल करण्यात आलेल्या विकसकांची नावे आहेत.

पीडित महिलेचा अभियंता आहे. ऐरोलीत विकासक असलेल्या विजय मिश्रा याने उत्तरप्रदेश येथील गावी बंगला बांधण्याचे काम पीडित महिलेच्या पतीला दिले होते. या कामात पती उत्तरप्रदेश येथे असल्यामुळे त्यांची पत्नी मुलांसह ऐरोलीत राहवयास होती. याच दरम्यानच्या कालावधीत पीडित महिलेच्या आईचे निधन झाल्यामुळे या महिलेच्या पतीने बिल्डर विजय मिश्रा याला घरी जाऊन मुले आणि पत्नी यांना धीर देण्यास सांगितले होते. यांनतर विजय मिश्रा यांनी सदर महिलेच्या घरी तिच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रकार केला असता तिने केलेल्या विरोधानंतर विजय मिश्रा याने  रिव्हॉल्वरचा धाक दाखवून या प्रकारबाबत कुठे वाच्यता न करण्याची धमकी देऊन तो निघून गेला. या प्रकारांनतर दुसऱ्या दिवशी पुन्हा मिश्रा याने सदर महिलेच्या घरी येऊन पतीने पैसे देण्यास सांगितले आहेत, असा खोटा बनाव केल्याने सदर महिलेनने विजय मिश्रा यांला घरात प्रवेश दिल्यांनतर तिला रिव्हॉल्वर दाखवून व मुलांना दुसऱ्या ठिकाणी पाठवून बलात्कार केल्याचे पीडित महिलेचे म्हणणे आहे. या प्रकारानंतर रबाळे पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यासाठी गेल्यानंतर तिला पोलिसांनी हाकलून लावले होते. याबाबतची माहिती मिश्रा बंधूंना मिळाल्यांनतर त्यांनी सदर महिलेला धमकवण्याचे सत्र सुरू केले होते. काही दिवसांनतर पती उत्तरप्रदेश येथून परत ऐरोलीत आल्यांनतर तिने पतीला प्रकाराची माहिती दिली. या प्रकरणाची दखल पोलीस घेत नसल्याचे पाहून पिडित महिला व तिच्या पतीने मुख्यमंत्र्यांकडे तक्रारही केली होती.