नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षी ५१४ धोकादायक इमारती होत्या. यंदा ही संख्या ५३५ झाली असून नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतीचे सन २०२४-२५ या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण ५३५ इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६४ नुसार धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २६५(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन ३० वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून ३० सप्टेंबर २०२४ पूर्वी संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण करून घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. नवी मुंबई शहरातील नागरीकांनी धोकादायक इमारतींचा संरचनात्मक अहवाल ३० सप्टेंबरपूर्वी करून न घेतल्यास २५ हजार रुपयांचा दंड केला जाणार आहे, महापालिकेने पाठविलेल्या सूचनेत नमूद करण्यात आले आहे. महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार शहरात ५३५ धोकादायक इमारती आहेत.

Accused in hit and run case in Ravet arrested Pune news
पिंपरी: रावेतमधील हिट अँड रन प्रकरण; चार दिवसांनी आरोपी अटकेत, ८० सीसीटीव्ही…
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
diwali boost for vehicle sales in pune car buying rise during diwali
अबब! ५५ हजार…
navi Mumbai car hit six people
नवी मुंबई: मित्राच्या स्कुटीला धडक मारल्याचा राग आल्याने सरळ पाच – सहा जणांच्या अंगावर घातली गाडी
fire incidents at 14 places in pune city on lakshmi laxmi pooja
पुणे : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शहरात ३१ ठिकाणी आगीच्या घटना; अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर घटना टळल्या
caught Fire at ten places due to firecracker fire broke out in a third floor flat in Kasarwadi
पिंपरी : फटाक्यांमुळे दहा ठिकाणी आगीच्या घटना; कासारवाडीतील तिसऱ्या मजल्यावरील सदनिकेला आग
Pune redevelopment old buildings, Pune old buildings, Stalled redevelopment old buildings pune,
पुणे : जुन्या इमारतींचा रखडलेला पुनर्विकास, अरुंद रस्ते कुठे आहेत हे प्रश्न !
pollution level of firecrackers
फटाक्यांच्या प्रदूषणाची पातळी कशी मोजली जाते? प्रदूषकांवर कारवाई करण्याचे अधिकार कोणाला असतात?

हेही वाचा : ठाण्याचा उमेदवार ‘डमी’ असल्याची गणेश नाईक समर्थकांची मुख्यमंत्र्यांवर टीका

महापालिकेची सूचना

नागरिकांकडून धोकादायक इमारतींचा / घराचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील याची नोंद घेण्यात यावी असे महापालिकेच्या वतीने सूचित करण्यात आले आहे.

हेही वाचा : युवतीच्या आत्महत्येस कारण असलेल्या दोन युवकांच्या विरोधात सहा महिन्यांनी गुन्हा दाखल 

पनवेलमध्ये ७९ धोकादायक बांधकामे

पनवेल महापालिका क्षेत्रात ७९ धोकादायक मालमत्ता असून पालिकेने जाहीर प्रसिद्धी पत्रकातून या मालमत्तांच्या भोगवटाधारकांना पावसाळ्यापूर्वी संबंधित जागा रिकामी करण्याचे आदेश दिले आहेत. ३० वर्षे जुने बांधकाम असल्यास बांधकाम अभियंत्याकडून स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा नियम आहे. काही वर्षांपूर्वी पनवेलमध्ये धोकादायक इमारत कोसळली होती. अतिवृष्टीमध्ये पनवेलमध्ये धोकादायक इमारतीमध्ये अनुचित घटना घडू नये यासाठी पालिकेने खबरदारी म्हणून मे महिन्यापासून धोकादायक इमारतींच्या मालमत्ताधारकांना सूचना पत्रातून जागृत करण्याचे काम केले आहे. धोकादायक इमारतींमध्ये अनुचित प्रकार घडल्यास संबंधित मालमत्तेचे मालक हेच जबाबदार राहतील असे सूचना पत्रातून कळविले आहे.