उरण : शनिवारी सिडकोच्या हेटवणे जलवाहिनीला उरण पनवेल मार्गावरील बोकडवीरा गावाजवळ गळती लागली आहे. त्यामुळे या जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया चालले आहे.एकिकडे पाण्याचा साठा कमी झाल्याने पाणी कपात आणि दुष्कळाची स्थिती निर्माण झाली असतांना दुसरीकडे मात्र पाणीपुरवठा विभागाच्या दुर्लक्षामुळे गळती लागल्याने हजारो लिटर पाणी वाया चालले आहे. ही जलवाहिनीला लागलेली गळती त्वरित थांबविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.
उरणच्या द्रोणागिरी नोड व येथील अनेक ग्रामपंचायतीना सिडकोच्या हेटवणे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. त्याचप्रमाणे एमआयडीसीच्या रानसई धरणातील पाणी पातळी व साठवणूक क्षमता कमी झाल्याने याच धरणातील उसणे पाणी घेतले जाते. मात्र सिडको कडून एमआयडीसी ला मागणी पेक्षा कमी पाणी पुरवठा केला जात आहे. याच स्थितीत उरण मधील सिडकोच्या हेटवणे धरणाच्या जलवाहिनीला मोठी गळती लागली आहे. त्यामुळे जलवाहिनीतून हजारो लिटर पाणी वाया जात आहे.



