फ्रान्समधल्या हवामानात सर्व ठिकाणी द्राक्षाची लागवड होते. पण त्यातल्या त्यात काही प्रांतांत द्राक्षाचं पीक गुणवत्तेच्या दृष्टीनं अधिक चांगलं होतं. बोर्दो, शाब्ली, र्बगडी, श्ॉंपेन या परगण्यातली द्राक्षे वाइन करण्यासाठी उत्तम असतात. त्याच्यातल्या टॅनिन, अ‍ॅसिड, शर्करा या घटकांचं नसíगक संतुलन योग्य प्रमाणात असल्यानं त्यांपासून होणारी वाइन दर्जेदार होते आणि मुख्य म्हणजे त्या त्या प्रांताच्या हवा-मातीचे गुण घेऊन येते. या परगण्यातनं मोठय़ा प्रमाणात वाइन बनवली जाते. मग ज्या परगण्यातली द्राक्षं असतील, त्या परगण्याचं नाव त्या ठिकाणी बनलेल्या वाइनच्या जातीला दिलं जातं. त्या त्या परगण्यातली वाइन आपापल्या द्राक्षांच्या वैशिष्टय़ांसह वेगळीच पांढरी वाइन आणि लाल वाइन असेही प्रकार आहेत.
याखेरीज काही वाइनचे प्रकार आहेत. ते म्हणजे, इतर फळांपासून बनवलेल्या वाइन. चेरी, एल्डरबरी, सफरचंद, पीच अशा निरनिराळ्या फळांपासून शिवाय मधापासून वाइन बनवल्या जातात. त्या वाइनला अपरिहार्यपणे त्या त्या फळांचा स्वाद येतो. त्या वाइन त्या त्या फळांच्या नावाने संबोधल्या जातात. जसं चेरी वाइन, एल्डरबरी वाइन आणि सफरचंदाच्या वाइनला सायडर तर मधापासून बनवलेल्या वाइनला मीड’ म्हणतात. ज्यावेळी वाइन म्हटलं जातं तेव्हा ती द्राक्षाचीच वाइन असते, फक्त त्याला रेस, व्हाईट ही विशेषणं लावतात. तसंच तिच्या चवीप्रमाणे गोड, निमगोड, अगदी अगोड असे प्रकार असतात. इंग्रजीत स्वीट आणि ड्राय असं म्हणतात. ड्राय म्हणजे ज्यात अजिबात शर्करा उरली नसलेली वाइन.
फळांनुसार वाइनचा स्वाद व घटक बदलात, पण यातील इथिल अल्कोहोलचं प्रमाण ८ ते १७ टक्क्यांपर्यंत असत. त्यामुळे उत्पादनाचे ठिकाण, द्राक्षे अथवा इतर फळे, यांच्या जाती, उत्पादनाची पद्धत, रंग, स्वाद, चव व अल्कोहोलचे प्रमाण यांवरून बाजारातील वाइनचे प्रकार ठरवले जातात.

मनमोराचा पिसारा: शेतकीतील सुख
बालपणी घडलेले आणि घडवलेले संस्कार आपण मनात ‘मर्मबंधातील ठेव’ म्हणून पाहतो. पोक्त, प्रौढ, ज्येष्ठ वयात त्यांची आठवण आली तर हरखून जातो. ‘कसे होते ना ते (गोड) दिवस?!’ असं म्हणून ‘नॉस्टॅल्जिआ’मध्ये हरवून जातो.
कधी मात्र हे संस्कार उलगडून पाहवे, ‘त्या’ संस्कारांनी आपल्याला कसा आकार मिळाला? त्यातून प्रगतशील मनोवृत्ती निर्माण झाली की सद्य परिस्थितीमधल्या समस्यांची बीजं तिथे सापडतात? जुन्या कवितांची ‘नॉस्टॅल्जिआची नशा’ उतरते आणि मन विचारमग्न होतं.
मानसशास्त्राचं हे खास वैशिष्टय़ की मनोव्यापारांकडे गूढरम्य म्हणून न पाहता, त्यांचं विश्लेषण करायचं आणि काही बोध घ्यायचा.
कवी यशवंतांची ‘शेतकीतील सुख’ ही कविता पाहा. वरकरणी मोहक आणि रमणीय वाटते. कदाचित ज्येष्ठ नागरिकांना ती शिकल्याचं स्मरणात असेल. त्या कवितेतलं सुख ‘अल्पसंतुष्टीतून’ उद्भवलंय की ‘आहे ते बरंय!’ माफक अपेक्षेनं जगाकडे पाहावं, कष्टांना सुख मानावं, खडतर जीवनाला भागधेय म्हणून स्वीकारावं? प्रश्न पडतात ना. शेतकऱ्यानं वाकळवरच झोपावं का?

Centers Discrimination about onion export Know what is Farmers Association Onion Growers Allegation
कांदा निर्यातीबाबत केंद्राचा दुजाभाव? जाणून घ्या, शेतकरी संघटना, कांदा उत्पादकांचा आरोप
wildlife lovers, Tigers, forest, cages,
‘वाघ जंगलात नको, पिंजऱ्यात हवेत का?’ वन्यजीवप्रेमींचा सवाल; प्रकरण काय? जाणून घ्या…
Vasai Virar
शहरबात… वन्यप्राण्यांच्या अधिवासांवर अतिक्रमणाचे परिणाम
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

शेतकीतील सुख-कविता
पूर्व पश्चिमा खळाळांतुनी वाहे जलवाहिनी, मांडवी अमुची
 दूर डोंगरासमीप अगदी तिच्या तीरावर, अमुची जमीन वतनी बरी
भरदार शिवारांमधे पिकें दाटली.
उगवत्या भानूची प्रभा नभीं फांकली
बांधावर गवतें हिरवी फोंफावली
वनलक्ष्मीचें अभिनव वैभव उतास जणुं चाललें
खगांनी तत्स्वागत गायिलें ।।१।।
सृष्टिसतीच्या आनंदाच्या प्रसन्न उत्सवदिनीं
शिवारामधें गात येऊनी
वरुणकृपेचा विलास ऐसा पाहुन मनमोहन
वाटलें चित्ती मन लागुन
कोपऱ्यावरील त्या आम्रतरूच्या तळीं
मृदु तृणांकुराची मखमल गादी भली
बुंध्यास टेकुनी, चक्रवर्ती जणुं बळी
भूक लागता चटणी किंवा कांदा अन् भाकर
खाऊनी द्यावी वर ढेकर।।२।।
धुमाळ-बाळा जोडी घेऊनी मोट धरावी कधीं
करावी राखण मळणी कधीं
रास घालुनी डोळे भरूनीं संतोषें पाहुनी
निजावे वाकळ मंग पसरूनी
वर चंद्रतारकामंडित ते अंबर
पायथ्यास पडुनी वाघ्या करि गुर्गुर
वाजती गळ्यांतील बैलांचे घुंगुर
लाखपटीनीं हे न सुखद का कृषीकर्मी राबणे
नको ते परवशतेचे जिणे ।।३।।
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: निसर्गापेक्षा माणूस वरिष्ठ श्रेणीवर
‘‘निसर्ग ही आता मानवी समाजाच्या मालकीची गोष्ट बनली. चांगला मालक हा आपल्या मालकीच्या गोष्टी दूरवरचा विचार करून राबवतो. चांगला समाज निसर्गही असाच राबवील. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी उतावीळपणे मारून खाण्यात शहाणपणा नसतोच. पण या पलीकडे जाऊन निसर्गावरचे मालकपण नाकारणे शहाणपणाचे ठरणार नाही. निसर्गाचे हे भांडार सदैव आपल्या दिमतीला आहे. जोपर्यंत माणसामाणसात बखेडा निर्माण होत नाही किंवा माणसाला बाधा होत नाही, तोपर्यंत ‘निसर्गाची हानी’, ‘विटंबना’ असे शब्दप्रयोग किंवा प्रतिमा वापरण्यात अर्थ नाही. वेगळ्या भाषेत सांगायचे म्हणजे, निसर्ग व माणूस यांच्यात एक संबंध आहे; पण ‘नाते’ नाही. हा संबंध उतरंडीचा आहे. त्यात माणूस हा वरिष्ठ श्रेणीवर आहे तर निसर्ग हा वेगळा, अलग व जाणीवहीन आहे.’’
राम बापट ‘राज्यसंस्था, भांडवलशाही आणि पर्यावरणवाद’ (मार्च २०१३) या पुस्तकातील एका लेखात निसर्ग आणि पर्यावरण यांच्यातील अनुबंध स्पष्ट करताना कडव्या पर्यावरणवाद्यांना काही गोष्टी सुनावताना लिहितात –
‘‘.. प्रत्येक व्यक्तीला आपल्या निवडीनुसार स्वत:च्या गरजा, कामना, आकांक्षा ठरविण्याचा अधिकार आहे. पण गरजा जास्त व साधने कमी या पेचातून प्रत्येक व्यक्तीला व समाजाला अग्रक्रम ठरवून यथोचित मार्ग काढावा लागतो. पण तसे करताना आपापल्या गरजा ठरविण्याच्या हरएक व्यक्तीच्या मूळ स्वातंत्र्याबद्दल नाके मुरडण्याचे कारण नाही. त्यात अर्थही नसतो व मतलबही नसतो. याच न्यायाने बाजारपेठेच्या संदर्भात ‘ग्राहकाचे सार्वभौमत्व’ या संकल्पनेला मोठा अर्थ प्राप्त होतो. एकूण अर्थव्यवहार कार्यक्षम, सकस, वर्धिष्णु व सतेज बनण्याकरता शासनाला किंवा अन्य सामाजिक संस्थांना प्रसंगानुरूप काही बंधने घालावी लागतील.
पण त्या नादात प्रत्येक व्यक्तीचे गरजा ठरवण्याच्या स्वातंत्र्याचे जर खच्चीकरण झाले किंवा ते कोलमडले, तर प्रथम आर्थिक व्यवहाराला व नंतर एकूणच सांस्कृतिक जीवनाला अवकळा येईल. असे फाजील नियंत्रण स्वत:च्या पायावर कुऱ्हाड मारण्यासारखे होईल.’’