दुधाळ समुद्र म्हणजेच ‘मिल्की सी’ ही समुद्रात घडून येणारी एक दुर्मीळ नैसर्गिक घटना आहे. चार्ल्स डार्विनने १८३० साली ‘बीगल’ जहाजावरून सागरसफर करताना दक्षिण अमेरिकेच्या टोकाला क्षितिजापर्यंत समुद्राचा पृष्ठभाग मंद प्रकाशात उजळून निघाला असल्याचे नमूद केले आहे. त्यापूर्वीही समुद्रातून सफर करणाऱ्या खलाशांनी मैलोनमैल दुधासारख्या पाण्यातून तर काहींनी वितळलेल्या शिशातून तसेच बर्फाच्या मैदानातून जात असल्याचा अनुभव घेतला होता. त्यांना समुद्राचे पाणी आकाशातील चांदण्याप्रमाणे चमकताना दिसले. त्यामागचे नेमके कारण स्पष्ट झाले नसल्यामुळे त्या कथा म्हणजे खलाशांचा कल्पनाविलास असावा असा समज होता.

हेही वाचा >>> कुतूहल : समुद्री साप

Animals, birds, heat stroke, Mumbai metropolis,
मुंबई महानगरात प्राणीपक्ष्यांना उष्मघाताचा त्रास, दिवसाला शंभरच्या आसपास पक्षीप्राणी जखमी
A bone stuck in a tiger's teeth
भक्ष्यावर ताव मारताना वाघाच्या दातात अडकले मोठा हाडाचा तुकडा; हातोड्याने….,थरारक व्हिडीओ एकदा बघाच
Unknown cargo ship collided with fishing boat in Palghar sea
पालघर समुद्रातील मासेमारी नौकेस अज्ञात मालवाहू जहाजाची धडक
Loksatta Lokrang Picture Painting Tourist places the sea
चित्रास कारण की: समुद्रसरडा

१८५४ मध्ये जावा बेटाकडे जाणाऱ्या अमेरिकन जहाजावरील खलाशांना रात्री समुद्राचा पृष्ठभाग पांढरा होऊन चमकत असल्याचे दिसले. कप्तानाने या समुद्राचे पाणी घेऊन सूक्ष्मदर्शक भिंगातून निरीक्षण केले असता त्या पाण्यात तरंगत असलेले चमकणारे सूक्ष्मजीव दिसले. समुद्रात प्रचंड मोठ्या संख्येने समूहाने वावरणाऱ्या अनेक सूक्ष्म प्राणी आणि वनस्पतींच्या अंगी जीवदीप्तीची क्षमता असते. वातावरणातील बदल, समुद्रातील हालचाली, लाटांचे तडाखे अशा कारणांनी येणारा ताण व स्वसंरक्षणाची निकड म्हणून त्यांच्या शरीरात ल्युसिफेरीन वर्गातील रसायने आणि ल्युसिफेरेज हे संप्रेरक तयार होतात.

ल्युसिफेरीनचा ऑक्सिजनशी संयोग घडून प्रकाशनिर्मिती होते. काही सूक्ष्म जिवाणू माशांच्या पचनसंस्थेत राहणे पसंत करतात व त्या माशांच्या पोटात शिरकाव व्हावा म्हणून त्यांना आकृष्ट करण्यासाठी स्वत:च्या शरीरातून प्रकाश उत्सर्जित करतात. कोट्यवधींच्या संख्येने अशी जीवदीप्ती असणारे सूक्ष्मजीव एकत्र आल्यानंतर अनेक मैलांचा परिसर चमकू लागतो. प्रत्यक्षात तो प्रकाश निळसर असला तरी रात्री दृष्टिपटलावरील प्रकाशसंवेदी पेशी रंगभेद करू शकत नसल्याने मानवी डोळ्यांना तो पांढरा भासतो.

हेही वाचा >>> कुतूहल: व्हेलमधील संवाद

जुलै २०१५ साली केरळमध्ये अलेप्पी येथे अशी घटना घडली असता राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था आणि केरळ मत्स्यव्यवसाय विभाग यांनी केलेल्या संशोधनातून नॉटिक्युला सिंटिलान्स या वनस्पती प्लवकामुळे समुद्र दुधाळ झाल्याचे निष्पन्न झाले. आतापर्यंत नोंद झालेल्या ‘दुधाळ समुद्राच्या’ अधिकांश घटना हिंदी महासागराच्या वायव्य दिशेला इंडोनेशियाच्या जवळ घडल्या आहेत. २०१९ साली जावा बेटाजवळ ‘दुधाळ समुद्रा’चा परिणाम ४५ रात्रींपर्यंत टिकून राहिला होता.

– डॉ. सीमा खोत

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : www.mavipa.org