यवतमाळ जिल्ह्यातील झरी-जामणी तालुक्यातील एका शेतकऱ्याची ही गोष्ट. एक तीन भावांचे कुटुंब. त्यांच्या एकत्रित मालकीची जमीन १८ एकर. पण इथूनच त्यांच्या वेगळेपणाला सुरुवात होते. ही तिन्ही भावांची कुटुंबे एकत्रितपणे आपल्याच शेतावर नियमित काम करतात. मनुष्यबळाची अधिक गरज पडली तरच बाहेरील कोणाला कामाकरिता बोलावले जाते. मनुष्यबळाचा सद्यस्थितीतील मोठा प्रश्न त्यांनी असा घरच्याघरी सोडविला आहे. तसेच नियमितपणे मिश्रपिकाची लागवड, पूर्ण जमिनीत किमान दोन वेळा पिके, विहिरी आणि शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याची अंतर्गत सोय, याचबरोबर वेळोवेळी त्या त्या पिकाच्या लागवडीबाबत योग्य तज्ज्ञाकडून मार्गदर्शन या सर्वाचा परिपाक म्हणून हे एकत्र कुटुंब आपल्या गावात सुखाने नांदत आहे.
तूर आणि कापूस यांची मिश्र लागवड शेतात केल्यावर त्यांना कापसाचे प्रमाण पूर्वीपेक्षा वाढलेले आढळले. मग तज्ज्ञांनी त्यांना तुरीचे प्रमाण वाढवायला सांगीतले. त्यांनी त्याची कारणे तज्ज्ञांकडून जाणून घेतली. तुरीच्या लागवडीमुळे जमिनीचा फायदा होतो, ही महत्त्वाची माहिती मिळाल्यावर त्या कुटुंबाने पुढील हंगामात शेतात तुरीचे प्रमाण वाढविले. उन्हाळ्यात शेततळ्यातील उपलब्ध पाणी किती जागेला पुरेल, याचा अंदाज घेऊन त्यांनी फक्त अध्र्या एकरवर टोमॅटोची लागवड केली. त्याची योग्य निगा राखली आणि जूनच्या पहिल्या, दुसऱ्या आठवडय़ात टोमॅटोचे पीक बाजारात नेले. त्यावेळी अगदी मोजक्याच शेतकऱ्यांकडील टोमॅटो बाजारात आले होते. त्यामुळे अगदी घाऊक बाजार असूनही चांगला तगडा दर मिळाला. परिणामी अध्र्या एकरातील टोमॅटोने खर्च वजा जाऊनसुद्धा भरघोस उत्पन्न मिळवून दिले.
 अर्थातच, याचा अर्थ सर्वानी टोमॅटो लावावा असा नाही. बाजारातील मागणीचा अंदाज घेऊन व आपल्याकडील उपलब्ध पाण्याची सोय बघून त्यानुसार नियोजन केल्यास असा चांगला फायदा होऊ शकतो एवढे नक्की. नाशवंत मालाची लागवड केल्यास जवळची बाजारपेठ निवडावी लागते. त्याऐवजी थोडे टिकाऊ उत्पादन असेल तर लांबची बाजारपेठही निवडता येईल. तद्वतच त्या उत्पादनावर प्रक्रिया करणारया एखाद्या कारखान्याशी संधान साधून त्यांना हा कच्चा माल पुरविल्यास त्या मार्गानेही चांगला दर मिळविता येईल.
 
जे देखे रवी.. – निवासी डॉक्टरांचे संप
खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांतले निवासी डॉक्टर संपावर जात नाहीत, कारण ते संपावर गेले तरी रुग्ण असतात कमीच, ते सहज सांभाळता येतात. ही रुग्णालये संगमरवरी किंवा काल्पनिकसुद्धा असू शकतात. इथल्या बऱ्याच मुलामुलींनी पदव्युत्तर शिक्षणासाठी जबर रक्कम भरलेली असते. तेव्हा हे सगळे सावध असतात. वार्षिक तपासणी होते तेव्हा या संस्थांमधून रुग्ण भरपूर असल्याचे जे नाटक केले जाते त्या नाटकासाठी हे विद्यार्थी रसद पुरवतात. इथे पूर्ण वेळ शिक्षक असतात; परंतु मान्यता मिळावी म्हणून फिरतीवरचे प्राध्यापकही नेमले जातात. कुंकवाचा धनी या न्यायाने यांना बक्कळ पगार मिळतो. हे सारे पैसे देणग्यांमधून मिळतात. काही पैसे काळे काही पांढरे. असे सांगतात की, भारतातले पहिले नोटा मोजण्याचे यंत्र एका खासगी वैद्यकीय संस्थेने विकत घेतले.
अशा खासगी संस्थांचे म्होरके राजकीय पुढारी असतात किंवा त्यांच्याशी संधान बांधून असतात. वार्षिक तपासणीसाठी ज्या संस्था मुक्रर केल्या जातात त्यांतले निरीक्षक या पुढाऱ्यांचे पित्ते असतात किंवा होऊ शकतात! यांच्यावर छापे पडले की मग काही कोटी रुपये सापडले असे वर्तमानपत्रांतून छापून येते. सगळय़ात महत्त्वाचे, या संस्थांना मालक असतात. मालकाची मुलेही नंतर मालक होतात. प्रशासन दुय्यम असते. कारभार एकहाती असल्यामुळे गडबड कमी होते. ‘तेरी भी चुप मेरी भी चुप’ असल्यामुळे संप होणे शक्य नसते.
सरकारी किंवा महानगर पालिकेच्या रुग्णालयांमधून अशी पाखरे येती या न्यायाने सगळे सतत बदलते. कोणीतरी मंत्री येतो तो त्याच्या कल्पना लढवतो. वैद्यकीय आस्थापनेत सनदी अधिकारी सर्वेसर्वा होता. त्यांना निवासी डॉक्टर म्हणजे काय हे आधी समजून सांगावे लागते. त्यांची आखणी चोख असते आणि होते, परंतु तोवर तेच बदलतात. राहून राहिले डीन किंवा रुग्णालयांचे वैद्यकीय अधिष्ठाते. आपल्या वरच्या या अधिकाऱ्यांना किंवा मंत्र्यांना गोष्टी समजावून सांगण्यात त्यांचा अर्धा वेळ जातो. त्यात त्यांना निरनिराळय़ा ठिकाणच्या फेऱ्या कराव्या लागतात. रुग्णालयांमधल्या कामगारांच्या आक्रमक संघटना सांभाळण्यात आणखी काही वेळ जातो. समारंभ आणि आगतस्वागत असते. स्वतचे बघावे लागते. औषध आणि यंत्रसामग्रीची खरेदी हा घोर कार्यक्रम कायमच बोकांडी असतो. अशात निवासी डॉक्टर ही गोष्ट लघुतम असते. ही पाखरे येतात आणि जात असतात. यांना बूड नसते. फारच काही गडबड झाली तर ठिणगी पडते. मग मार्ड नावाचा मर्द छाती ठोकू लागतो. वाटाघाटी होतात. ‘रुग्णांचे हाल’ या मथळय़ाखाली छायाचित्रे छापून येतात. मग काहीतरी तोडगा निघतो.
नेमेचि येतो पावसाळा, पण तो नेमेचि सरतोही. मग सर्वत्र नवी पाखरे येतात आणि काळ पुढच्या संपाचे बी पोटात वाढवत वाट बघत बसतो.
– रविन मायदेव थत्ते  rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस – आर्तविकार : छोटे छोटे दोष
विटाळ हा मराठी भाषेतील शब्द चमत्कारिक आहे. संस्कृत शब्द आर्तव म्हणजे ठराविक ऋतूत येणाऱ्या स्त्रावाचा विचार, असा आहे. काल व आर्तवाचे प्रमाण हे व्यवस्थित असले म्हणजे स्त्रियांचे सर्वतऱ्हेचे स्वास्थ्य असते. शहरी जीवनातील कृत्रिम राहणी, अवेळी व एकांगी आहार, धावपळ, पुरुषी पद्धतीच्या जीवनाचा नाइलाजाने अंगीकार अशा विविध कारणांनी स्त्रियांना विटाळ कमी येणे, उशिरा येणे, अजिबात न येणे, नुसतेच दर्शन होणे, विटाळाचेवेळी कष्ट होणे, अंगावर खूपच जाणे, विटाळास घाण वास येणे, गाठी जाणे अशा विविध स्वरूपाच्या पीडा होत असतात. वयात आल्यानंतर वयाच्या १२-१३ वर्षांपासून ५० वयापर्यंत गर्भारपणाचा काळ सोडल्यास स्त्रीला, दर २८ दिवसांनी चार दिवस व्यवस्थित विटाळ यावा. घाण वास, डाग पडणे, कष्ट होणे, अति विटाळ जाणे या गोष्टी अपेक्षित नसतात. या तक्रारी वेळच्या वेळी नीट हाताळल्या तर स्त्री आपले पत्नी, गृहिणी, माता, सचिव अशा विविध जबाबदाऱ्या सहजपणे पेलू शकते.
अनार्तव, अल्पार्तव, अत्यार्तव यांचा विचार स्वतंत्र लेखात करत आहोत.  पोट दुखणे ही तक्रार खास करून तरुण मुलींमध्ये असते.  त्याकरिता सकाळसायंकाळी गोक्षुरादि गुग्गुळ, लघुसूतशेखर, आम्लपित्त वटी प्र. ३ गोळ्या जेवणाअगोदर; व जेवणानंतर कुमारी आसव ४ चमचे घ्यावे. चिमुटभर बाळंतशोपा चावून खाव्या. विटाळास घाण वास व विटाळाच्या गाठी अशा तक्रारींकरिता जेवणानंतर जीरकाद्यारिष्ट घ्यावे. सकाळी व सायंकाळी चंद्रप्रभा, कामदुधा प्रवाळ प्र. ३ गोळ्या; सकाळी एक चमचा जिरे ठेचून एक कप पाण्याबरोबर घ्यावे. पांडुता असल्यास शतावरी कल्प दोन वेळा दुधाबरोबर घ्यावा. विटाळ नेहमीपेक्षा उशिरा येत असल्यास कुमारी आसव, फलत्रिकादि काढा, सातापा काढा यापैकी एक वा दोन काढे दोन्ही जेवणानंतर चार चमचे घ्यावेत. रोज दोन खारका खाव्यात. जेवणानंतर बाळंतशोपा खाव्या. पांडुता असल्यास चंद्रप्रभा, कठपुतळी, कन्यालोहादि वटी सकाळ, संध्याकाळ घ्यावी
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

titwala farmer death marathi news
टिटवाळ्यात जमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत शेतकऱ्याचा मृत्यू, फळेगाव-उतणे गावांमधील शेतकऱ्यांमध्ये वाद
Goa Police
आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना
Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
Kolhapur Police arrest gang selling fake notes
बनावट नोटांची छपाई, विक्री करणारी टोळी कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात; म्होरक्याचे नेत्यांशी लागेबांधे असल्याची चर्चा

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १३ एप्रिल
१९५१ > औंध संस्थानचे अधिपती  भवानराव श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी (बाळासाहेब) यांचे निधन. इंदूर येथे १९३५ मध्ये झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. प्रामुख्याने व्यायाम-प्रसाराची आणि १४ पौराणिक व १४ ऐतिहासिक आख्यानांची पुस्तके त्यांनी लिहिली असली, तरी ‘शूर शिपाई’ या सामाजिक कादंबरीचेही लेखन त्यांनी केले. मराठी साहित्यानेच नव्हे तर संस्कृतीने आठवावे असे त्यांचे कर्तृत्व म्हणजे, ‘चित्ररामायण’ या चित्रमालिकेतून त्यांनी आजच्या ‘ग्राफिक नॉव्हेल’ (चित्रकादंबरी) प्रमाणे रामायणातील सर्ग कमी शब्दांनिशी, चित्रांतून उलगडले होते.
१९७३  > मराठी संस्कृतीच्या बिगरराजकीय इतिहासाचे दालन तब्बल ५० महत्त्वाच्या पुस्तकांनिशी समृद्ध, संपन्न करणारे संशोधक अनंत काकबा प्रियोळकर यांचे निधन. रावबहादूर दादोबा पांडुरंग तर्खडकर, भाऊ दाजी लाड अशा इतिहासपुरुषांचा चरित्रवेध प्रियोळकरांनी घेतला; तसेच मोरोपंत, मुक्तेश्वर, रघुनाथपंडित आदी पंतकवींची संपादने उपलब्ध करून दिली. ‘मुसलमानांची जुनी मराठी कविता’, फादर स्टीफन्सचे ख्रिस्तपुराण’, ‘गोमंतकाची सरस्वती’ अशा संशोधन-संपादनांतून मराठीचे वैविध्य समोर आले.
– संजय वझरेकर