पशूंना तहान लागल्यावरच प्यायला पाणी मिळाले पाहिजे, याकडे आपण गांभीर्याने लक्ष देत नाही. उत्पादन देणाऱ्या म्हणजे दूध देणाऱ्या गायी/ म्हशी व शेतीकाम/ ओढकाम करणारे बल यांना इतरांपेक्षा जास्त पाण्याची गरज भासते. म्हणून त्यांना जास्त तहान लागते. सध्याच्या गोपालन/ म्हैसपालन (लहान वासरे, कालवडी, गाभण, व्यायलेल्या गाई, म्हशी, बल, वळू इ.) व्यवस्थापनात सर्वसाधारणपणे त्यांना पाणी पाजण्याच्या ठरावीक वेळा पशुपालक ठरवतात व पाणी पिण्याची गरज नसतानासुद्धा पशूंना एकदम तीन-चार बादल्या पाणी पाजले जाते.
तहान लागल्यावर पशूला पाण्यापासून वंचित ठेवणे, हे अयोग्यच. त्यासाठी पाणी २४ तास त्यांच्या पुढय़ात राहील, याची व्यवस्था करायला हवी. रवंथ करणाऱ्या पशूंमध्ये त्यांनी एक-दीड तास रवंथ केले की त्यांना तहान लागते. त्या वेळी ४००-४५० किलो वजनाच्या गाई-म्हशीला किमान चार ते पाच लिटर पाणी प्यावयास लागते. असे सावकाश पाणी प्यायल्याने दूध तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल कोठीपोटात तयार होऊन तो रक्तातून कासेला मिळतो.
 परंतु सध्याच्या गरज नसताना पाणी पाजण्याच्या पद्धतीमुळे, एका वेळी तीन-चार बादल्या पाणी पशूंना पाजले जाते. त्यामुळे पुढचे दोन-तीन तास पशूंचे रवंथ करणे जवळजवळ बंद होते आणि आपोआपच पचन क्रियेवर अतिरिक्त ताण येतो. तहान लागल्यावरच पाणी देणे वा २४ तास पशूंपुढे पाणी ठेवणे, या व्यवस्थापनामुळे मात्र फायदे होतात. पशूंच्या दुधामध्ये १५ ते २८ टक्क्यांपर्यंत तर दुधातील चरबीमध्ये वाढ होते. पशूंना पातळ शेण येण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे गोठा नेहमी स्वच्छ राहतो. त्याची साफसफाई करण्याच्या वेळेत व श्रमात बचत होते.
पाण्याच्या या व्यवस्थापन पद्धतीत अतिरिक्त ऊर्जा (वीज, डिझेल, पेट्रोल, रॉकेल, पंप, इंजिन वगरे) खर्च होत नाही. पाण्याची भांडी पाइपने मुख्य टाकीला अशी जोडायची की दोन्हीकडे पाण्याची पातळी सारखीच राहील. जसजसे गाई- म्हशींच्या समोरील भांडय़ातील पाणी संपत जाईल, तसतसे टाकीतील पाणी आपोआपच भांडय़ाला जोडलेल्या पाइपमधून येत राहील.

जे देखे रवी.. – लढा : अंक दुसरा – भाग ६
मी लहान होतो तेव्हा माझी आई मला ‘तू अधिक आहेस’ असे वारंवार सांगत असे. पुढे आमचे कुटुंब गुजराथेत राहू लागले तेव्हा ‘रवीन तुझा वधारेपण कमी कर’७ असे बजावत असे. आयुष्यात तिच्यावर मी सगळ्यात जास्त प्रेम केले, पण तिचे ऐकले मात्र नाही. तेच वधारेपण आयुष्यात मला बऱ्याच वेळा बाधले अर्थात त्यामुळे बरेच काही घडले हेही खरेच.
आई गेली आणि पुढे बायको आली मग तिने माझे रसग्रहण सुरू केले. तीही माझ्या आईचीच री ओढते. माझ्या आयुष्यातल्या या उद्यान नावाच्या प्रवेशात हा माझा अतिऊर्जायुक्त जादापणा नडला असण्याची शक्यता आहे. लोकशाही प्रणाली वापरून उद्याने उभी राहत नाहीत. ‘त्याला पाहिजे जातीचे’ हे खरे असणार पण त्या वेळी काहीतरी शिजत असते. सहकारी तुम्हाला कंटाळतात असे होऊ शकते त्यातच माझ्याबद्दल वर्तमानपत्रात त्या उद्यानासंबंधात एक कौतुकास्पद बातमी छापून आली आणि उंटावरच्या ओझ्यामध्ये काडीची भर पडली. खरे तर या बातमीत माझा कणभरही हात नव्हता. मी हिला म्हटलेसुद्धा ‘कशाला ही वार्ताहर लिहिते आहे?’ पण बातमी आली आणि उद्यानात मला एकना एक तऱ्हेने शह देणे सुरू झाले. मला ते सहन होईना. मी राजीनामा दिला. उद्वेगाने पत्रव्यवहार केला, पण मागे म्हटले तसे जनमानस बघे असते. त्या उद्यानाचा मी चेहरा होतो. अनेकांनी माझे श्रम पाहिले होते, पण ‘कळले की नाही डॉक्टरांनी राजीनामा दिला’ या gossip च्या पलीकडे फारसे काही घडले नाही.
 पुढे वज्रघात झाला. आयुक्त काळे यांच्या ‘आम्ही हे उद्यान कोणालाही अधिकृतपणे देणार नाही.’ या प्रतिज्ञापत्राला धुडकावून लावत याच आमच्या संस्थेशी एकदा नव्हे दोनदा पाच-पाच वर्षांचे करार झाले. एकदा करार करायची पद्धत पडली तर हिंदुजा घुसतील ‘आमच्याकडे भरपूर पैसे आहेत याचे आम्ही नंदनवन करू.’ असे म्हणतील. मग भानगडी करून इमारती बांधतील, असे शिरा ताणून ओरडत एकदा नव्हे तीनदा कोर्टात गेलो, पण हरलो.
ज्या कोर्टात एकेकाळी जिंकलो आणि ज्या मुद्दय़ावर जिंकलो होतो तो मुद्दा आता उपयोगी पडला नाही. त्या वेळेला सीताराम कुंटे नगरपालिकेत संयुक्त आयुक्त होते. त्यांनीही या कराराला विरोध केला, पण काळच बदलला होता. असे खरे  तर मी लिहू नये, पण ज्या दोन अधिकाऱ्यांनी हे पाच वर्षांचे करार केले त्यांच्यावर काही इतर कारणांमुळे तुरुंगात जायची वेळ आली. उद्यानाची देखभाल एका कंत्राटदाराला सोपविण्यात आली त्याने उद्यानाची अक्षम्य आबाळ केली.
 मग आणखी एक चमत्कार घडला त्याबद्दल उद्या.
– रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com

Can zero soda or soda water be good for you?
गरम होतंय म्हणून गारेगार सोडा पिताय? सावधान! आरोग्यावर होतील दुष्परिणाम
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
Loksatta chaurang Isolation due to the person uniqueness or perceived inferiority
‘एका’ मनात होती..!: शिक्का.. लादून घेतलेला!
Money Mantra, insurance, tax saving, investments
Money Mantra: कर बचतीसाठी केलेल्या गुंतवणुकीत विम्याचे काही चांगले पर्याय आहेत का?

वॉर अँड पीस- क्षय : भाग १
सर्व रोगांचा राजा असा लौकिक असलेल्या या विकाराने गेली हजारो वर्षे असंख्य बळी घेतले असतील. आधुनिक विज्ञानाची प्रभावी औषधेसुद्धा १९४० सालापर्यंत गुण देत नव्हती. कोरडी हवा, पथ्यपाणी, सुवर्णाची औषधे, विश्रांति, पिंपळीकल्प, अमरकंदासारख्या प्रभावी औषधांनी आयुर्वेदीय चिकित्साकाम आजपर्यंत बजावत आणले. त्यातील काही औषधे आजही उत्तम काम देतात. आयुर्वेदाचे ‘शाश्वत गुण’हे महत्त्व सांगणारी पिंपळी आज अ‍ॅलोपॅथी शास्त्रसुद्धा स्वीकारू लागले आहे. राजयक्ष्मा वा क्षय असाध्य अवस्थेत जातो, याचे कारण ‘धातूंचा क्षय’ ही अवस्था,  रोगाची प्राथमिक पायरी असते. रोग्याने स्वत:कडे दुर्लक्ष केलेले असते. प्रतिकारशक्ती डाऊन असते. त्यामानाने पोषण कमी. त्यात रुची, ताप ही लक्षणे सोबत असली की बघायलाच नको.
आयुर्वेदात राजयक्ष्माचे दोन प्रकारे वर्गीकरण केले आहे. एका प्रकारात प्रथम शुक्र धातूच्या क्षीणतेमुळे मज्जा, अस्थि, मेद, मांस, रस, रक्त हे धातू क्षीण होत जाणे, हा प्रतिलोमक्षय होय. नैसर्गिकपणे क्रमाने रसरक्तादि धातूंचा क्षय होणे हा अनुलोमक्षय होय. याशिवाय त्रिरूप, षड्रूप व एकादशरूप हे लक्षणावरून केलेले तीन प्रकार आहेत.आधुनिक विज्ञानाचे अखिल मानवजातीवर मोठे उपकार आहेत. विशेषत: क्षय विकारात अ‍ॅलोपॅथिक विज्ञानाने एका मागोमाग स्ट्रेप्टोमायसिन, रिफॉपिसीन अशी प्रभावी औषधे शोधून काढून त्यांच्या परीने क्षयाचे पूर्ण निर्मूलन करावयाचा मोठा यशस्वी प्रयत्न केला. त्या औषधांना मर्यादा असल्यातरी एरवी असाध्य मानल्या गेलेल्या महाभयंकर राजयक्ष्मा विकाराला एरवी आटोक्यात आणताच आले नसते. माझ्याकडे येणाऱ्या क्षय व महारोग्याच्या रुग्णांना मी नेहमी सांगतो, अ‍ॅलोपॅथीची उपाययोजना सुरू केली असेल तर ती अर्धवट थांबवू नका. पुरी करा. रोगप्रतिकारशक्ती वाढत नसेल तर मात्र आयुर्वेदाकडे या, नेटाने पथ्यपाणी सांभाळत रोगमुक्त होईपर्यंत औषध घ्या. रोगनिदान निश्चितीकरिता आधुनिक विज्ञानाची मोलाची मदत होते.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत – १७ जुलै
१८९५> ‘संगीत संभाजी’ हे  नाटक लिहिणाऱ्या सोनाबाई चिमाजी केसकर यांचे अवघ्या १५व्या वर्षीच निधन.
१९२७> वक्ता व लेखक या दोन्ही भूमिका लीलया निभावणारे, अनेक पुस्तकांचे लेखक प्रा. शिवाजीराव भोसले यांचा जन्म. त्यांच्या वक्तृत्वाची मोहिनी महाराष्ट्रावर पाच दशके राहिली. २०१० साली त्यांचे निधन झाले.
१९३६> कथाकार, चरित्रलेखिका मृणालिनी परशुराम जोगळेकर यांचा जन्म. कथांखेरीज ‘स्त्रीमुक्तीच्या पाऊलखुणा’तून त्यांनी ‘पं. रमाबाई, रमाबाई रानडे, ताराबाई शिंदे, जनाक्का शिंदे यांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला.
१९४८ > लेखक, पत्रकार, संपादक, नाटककार, कादंबरीकार अनिल सदाशिव बर्वे यांचा जन्म. वयाच्या अवघ्या ३६व्या वर्षी निधन झालेल्या बव्र्यानी नक्षलवादी चळवळीसंबंधी ‘रोखलेल्या बंदुका, उठलेली जनता’ हे पुस्तक लिहिले, ‘डोंगर म्हातारा झाला’, ‘स्टडफार्म’ (कादंबऱ्या) थँक्यू मि. ग्लाड,  हमीदाबाईची कोठी, पुत्रकामेष्टी, आकाश पेलताना आदी नाटके आणि ‘मा निषाद’, ‘फाशीगेट’ हे कथासंग्रह त्यांचे.
२००१> ‘हिरव्या चादरीवर’, ‘नाटकांच्या नवलकथा’ या पुस्तकांचे लेखक, नाटय़-चित्रसमीक्षक वासुदेव यशवंत गाडगीळ यांचे निधन.
– संजय वझरेकर