डिजिटल इंटरॅक्टीव्ह फळ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा हसतखेळत अभ्यास

पालघर : करोनाकाळानंतर पूर्ववत सुरू झालेल्या जिल्हा परिषद शाळांमधील मरगळ दूर व्हावी, विद्यार्थ्यांनी उत्साहाने शाळेत यावे, यासाठी निरनिराळे प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक प्रयत्न म्हणून डहाणू, पालघर आणि वसई तालुक्यातील किनारपट्टी भागातील चौदा शाळांना इंटरॅक्टीव्ह फळे अर्थात डिजिटल इंटरॅक्टिव्ह स्मार्टबोर्ड देण्यात आले आहेत. त्यामुळे या स्मार्ट शाळा आता विद्यार्थ्यांच्या स्वागतास सज्ज झाल्या आहेत. या अनोख्या फळय़ाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बाहेरच्या जगाशी संपर्क साधता येईल तसेच रोजच्या व्यवहाराचे ज्ञानही मिळणार आहे. डिजिटल अभ्यासही करता येणार आहे.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
challenged to RTE new rules in High Court
पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे! ‘आरटीई’ नव्या नियमांना उच्च न्यायालयात आव्हान
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत

तेल व नैसर्गिक वायू मंडळ आणि थिंकशार्प फाउंडेशनमार्फत या डिजिटल फळय़ांचे वाटप केले गेले. तसेच याविषयी प्रशिक्षणही दिले गेले.  अभ्यास करताना या फळय़ांमुळे विद्यार्थ्यांना नक्कीच मजा येईल. त्यांच्या ज्ञानात हसतखेळत भर पडत असल्याने हा उपक्रम महत्त्वाचा वाटतो असे मत नैसर्गिक तेल व वायू महामंडळाचे व्यवस्थापक किरण निकम यांनी व्यक्त केले. मल्याण जिल्हा परिषद शाळेत या कार्यक्रमाचे प्रातिनिधिक उदघाटन करण्यात आले.

मुख्याध्यापिका ममता पटेल आणि शिक्षकवर्ग यांनी या वेळी वाटप केलेल्या साहित्याचा उपयोग आणि वापर याची माहिती घेतली. मल्याण शाळेचे शिक्षक आनंद आनेमवाड यांना केंद्र शासनाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला. महामंडळाच्या व्यवस्थापक देबस्मिता नाथ,  जनसंपर्क अधिकारी अंकिता सोनार, थिंकशार्पचे संतोष फड, अमित कुतवळ, सारिका दुबळा आदी कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

समाविष्ट शाळा

डहाणू तालुक्यात जिल्हा परिषदेच्या मल्याण मराठी शाळा, आगर शाळा, धाकटी डहाणू शाळा, डहाणू शाळा क्र.२ तर पालघर तालुक्यातील उच्छेळी, खारेकुरण, टेम्भी, गवराई, एडवण जिल्हा परिषद शाळांसह वसईतील अर्नाळा गाव व अर्नाळा किल्ला शाळेला हे डिजिटल फळे देण्यात आले.