पालघर: प्रथम महाविकास आघाडी व नंतर महायुती यांच्याशी जवळीक असणाऱ्या जिजाऊ संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे यांनी गेल्या वर्षी स्थापन केलेल्या जिजाऊ विकास पार्टी तर्फे भिवंडी व पालघर या दोन लोकसभा लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

जिजाऊ विकास पार्टी तर्फे भिवंडी मधून स्वतः निलेश सांबरे तर पालघर लोकसभा मतदारसंघांमधून कल्पेश भावर यांची उमेदवारी जाहीर करून त्यांनी इतर कोणत्याही राजकीय पक्षांना समर्थन देणार असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा…पालघर : उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी खासदारांचा प्रचार

विद्यमान लोकप्रतिनिधींवर व त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका, टिपणी करत राजकारणाच्या मदतीने शंभर टक्के समाज करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला शिक्षण आरोग्य रोजगार निर्मिती व स्पर्धा परीक्षा तयारी बाबत आपली संघटना गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असल्याचे सांगत कुपोषण व स्थलांतर असे विषय संवेदनशील पणे हाताळणार असल्याचे सांगितले. प्रस्तावित वाढवण बंदराला आपला विरोध राहील तसेच जिल्ह्याला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध होईल यासाठी व सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील राहू असे त्यांनी सांगितले.