पालघर : केंद्रशासित प्रदेशातून अवैध मार्गाने मद्य वाहतूक करण्यासाठी तस्करी टोळय़ा वेगवेगळय़ा योजना आखत असतात. त्यामुळेच उत्पादन शुल्क विभाग, पोलीस विभागानेही या अवैध मद्य वाहतुकीला चाप लावण्यासाठी गस्त वाढवली आहे. त्याअंतर्गत कारवाईत गेल्या वर्षभरात पालघर उत्पादन शुल्क विभागाने सुमारे पाच कोटींचे परवाना नसलेले मद्य जप्त केले आहे. दमण, सिल्वासा या केंद्रशासित प्रदेशाच्या भागातून मद्य वाहतुकीवर निर्बंध आहेत. वेगवेगळय़ा चेकपोस्टवर गस्त वाढवल्याने उत्पादन शुल्क दर कमी असणारी दारू महाराष्ट्रामार्गे अन्य ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न तस्करांकडून होत असतात.  गुजरात राज्यातील नागोळ, संजाण, उंबरगावमार्गे बोर्डी-घोलवड इथे हे मद्य आणून वेगवेगळय़ा मार्गाने तसेच रेल्वेमार्गे गुजरात राज्यात वितरित करण्याचा प्रयत्न केल्याचे अलीकडेच उघड झाले होते.

घोलवड रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या वलसाड फास्ट पॅसेंजरमधून मद्य वाहतूक करणाऱ्यांवर रेल्वे पोलिसांनी गेल्या महिन्यात कारवाई केली होती. तसेच गेल्या आठवडय़ातील कारवाईदरम्यान उत्पादन शुल्क विभागाने घोलवड रेल्वे स्थानकाबाहेर सुमारे १४ लाखांचे मद्य जप्त केले होते. हे रेल्वे स्थानक तसे एकाकी असून, ते पोलिसांच्या कार्यक्षेत्रापासून लांब आहे, शिवाय येथे मनुष्यबळही मर्यादित आहे. हे लक्षात घेऊनच मद्यतस्कर येथून मद्याची ने-आण करताना दिसतात. या रेल्वे स्थानकावरील सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे. याविषयी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक डॉ. व्ही. टी. भुकन म्हणाले, भरारी पथकाने अवैध मद्य वाहतुकीवर निर्बंध आणण्यासाठी धडक मोहीम राबवली आहे. गेल्या वर्षभरात सुमारे पाच कोटींचे अवैध मद्य विविध कारवायांमध्ये जप्त करण्यात आले आहे.

Indian Railway Recruitment 2024 RRB RPF Notification 2024
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी; ‘या’ पदासाठी रेल्वे विभागाकडून मेगा भरती, कुठे करायचा अर्ज? पगार किती? जाणून घ्या
bmc, mumbai municipal corporation, Undertake Rs 209 Crore Drainage Project, Prevent Flooding, Andheri Subway, milan subway, bmc drainage project, mumbai monsoon, mumbai waterlogging, mumbai news,
अंधेरी सब वे पूरमुक्त करण्यासाठी आणखी २०९ कोटी, किमान तीन वर्षे लागणार
Traffic Congestion Worsens in bandra santacruz vakola
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, वाहतुकीचा प्रश्न सोडविण्याची गरज
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य