20 November 2017

News Flash

बॉलिवूडमधील ‘रोमान्स’ची बदलती व्याख्या..

कलाकारांच्या वयातील अंतराचा त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीवर मात्र तिळमात्र परिणाम झाला नाही

August 31, 2016 6:25 PM

1 of 5
ae-dil-hai-mushkil

बॉलिवूड…झगमगाट, प्रसिद्धी, शान सर्व काही अपेक्षेप्रमाणेच फिल्मी. गीतकार, संगीतकार, निर्माते, दिग्दर्शक यांच्यासह अभिनेता आणि अभिनेत्री हे चित्रपटसृष्टीचे कलात्मक चेहरे. हिंदी चित्रपटसृष्टीत सुरुवातीच्या काळापासूनच नायक आणि नायिकांच्या प्रेमासोबतच त्याभोवती फिरणाऱ्या कथानकांना चाहत्यांची नेहमीच पसंती मिळाली आहे. असे असले तरीही बदलत्या काळासोबत बॉलिवूडमध्ये रोमान्सची व्याख्याही बदलली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांत असे अनेक चित्रपट गाजले ज्यांमध्ये अभिनेत्याच्या जोडीला असणाऱ्या अभिनेत्री जवळपास त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या आहेत. कलाकारांच्या वयातील अंतराचा त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीवर मात्र तिळमात्र परिणाम झाला नाही असेच म्हणावे लागेल. सध्या चर्चेत असणाऱ्या ‘बार बार देखो’ आणि ‘ए दिल है मुश्किल’ या चित्रपटांमधील कलाकारांच्या वयोमानावरुन आणि त्यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीवरुन बऱ्याच चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदर्शित झालेले हे काही चित्रपट.

1 of 5

First Published on August 31, 2016 6:25 pm