गणपतीच्या दिवसांत ‘आमच्या पप्पांनी गणपती आणला’ हे गाणं सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालं होतं. हे मूळ गाणं माऊली घोरपडे आणि शौर्या घोरपडे या दोन भावंडांनी गायलं आहे. परंतु, या गाण्यावरचा बालकलाकार साईराज केंद्रेचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल झाला होता. साईराजचे गोंडस व निरागस हावभाव पाहून सगळेच थक्क झाले होते. सोशल मीडियावर सर्वत्र साईराजची चर्चा चालू होती. आता पुन्हा एकदा हा बालकलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

साईराजने ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय मालिकेत एन्ट्री घेतली आहे. ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत तो महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. अप्पी सर्वांपासून दूर उत्तराखंडमध्ये तिचं कर्तव्य बजावत असते. आता त्यांचा लेक देखील बऱ्यापैकी मोठा झालेला असतो. त्यामुळे ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत प्रेक्षकांना सात वर्षांचा लीप आल्याचं पाहायला मिळेल. अप्पीच्या मुलाची भूमिका साईराज साकारणार आहे.

Due to technical reasons, the first episode of Shruti Marathe Bhumikanya serial was not screened
‘शिवा’प्रमाणेच श्रुती मराठेच्या ‘भूमिकन्या’ नव्या मालिकेच्या पहिल्या भागाचं प्रेक्षपण रखडलं, प्रेक्षकांची मागितली माफी
Devyani fame Madhav Deochake entry in aboli marathi serial
‘देवयानी’ फेम अभिनेत्याची ६ वर्षांनंतर ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत दमदार एन्ट्री, झळकणार महत्त्वाच्या भूमिकेत
female figures on stage
‘ती’च्या निर्णायकतेचे कवडसे
actor Rishi Saxena entry in aai kuthe kay karte marathi serial
‘लक्ष्मीच्या पाऊलांनी’ फेम ईशा केसकरच्या बॉयफ्रेंडची ‘स्टार प्रवाह’च्या लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, तब्बल ६ वर्षांनंतर मालिकाविश्वात पुनरागमन
Janhvi Kapoor, fan,
जान्हवी कपूरच्या चाहत्याने ‘मिस्टर ॲण्ड मिसेस माही’ चे १८ खेळ केले बूक
Marathi Drama Gela Madhav Kunikade
प्रशांत दामलेंनी उलगडलं ६३ चं कोडं! ‘गेला माधव कुणीकडे’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला!
actor rohan patil who played role of manoj jarange share experiences during movie to media representatives
मनोज जरांगेची भूमिका करणारा अभिनेता म्हणाला ” दोनच दिवस उपाशी…”
Dinesh Karthik
IPL 2024: दिनेश कार्तिक, महेंद्रसिंग धोनीच्या छायेत आणि संधीच्या प्रतीक्षेत राहूनही स्वत:चं स्थान निर्माण करणारा लढवय्या

हेही वाचा : मुहूर्त ठरला! ‘शिवा’ मालिकेतील अभिनेता अडकणार विवाहबंधनात, शाल्व-श्रेयाच्या घरी लगीनघाई

अप्पी अर्जुनला वचन देते की, ती त्यांच्या मुलाला वडिलांबद्दल कधीच काही सांगणार नाही. अशातच अप्पी आणि तिचा चिमुकला लेक मंदिरात जातात. यावेळी दर्शन घेऊन अप्पी अमोलला सांगते, “तू इथेच उभा राहा मी प्रदक्षिणा मारते” तेवढ्यात या मंदिरात दर्शन घेण्यासाठी अर्जुन येतो. मुलाला वडिलांपासून दूर ठेवण्याचं वचन अप्पीनं निभावलं पण, या छोट्या पावलांनी बाबांना शोधलं…आता सात वर्षांपूर्वी तुटलेली नाती, मालिकेत जोडली जातील का? हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

हेही वाचा : नव्या मालिकांचा सपाटा! ‘कलर्स मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा, जबरदस्त प्रोमो आला समोर

दरम्यान, साईराजच्या मालिकेतील एन्ट्रीमुळे प्रेक्षक आनंदी झाले आहे. त्याचा गोंडस अंदाज प्रत्येकालाचा भावतो. त्यामुळे मालिकेच्या नव्या प्रोमोवर शुभेच्छांचा व कौतुकाचा वर्षाव नेटकऱ्यांनी केला आहे.