राज्यात दुसऱ्या टप्प्यात आज आठ मतदारसंघांमध्ये होणाऱ्या निवडणुकीत चुरशीच्या लढती होणार आहेत. प्रकाश आंबेडकर,  नवनीत राणा, प्रतापराव जाधव, संजय जाधव, प्रतापराव चिखलीकर आदी उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे.  विदर्भातील पाचपैकी वर्धा, यवतमाळ-वाशीममध्ये महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी थेट लढत होत असून अकोला, अमरावती आणि बुलढाणा या मतदारसंघात तिरंगी लढत आहे. येथे तिसऱ्या उमेदवाराकडून होणारे मतविभाजन निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. याबाबत नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“सकाळपासून मला असं वाटतंय की अमरावतीची जनता या सुनेला आशीर्वाद देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी मैदान जिंकतील. हे मैदान देशाचं आहे. देशाच्या हिताकरता मैदान मोदी जिंकतील”, असा विश्वास त्यांनी निर्माण केला.

babajani durrani, Jayant Patil,
परभणीत अजित पवार गटाला धक्का ? बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर तर्कवितर्क
vivek kolhe marathi news
नगरमध्ये भाजपचे विवेक कोल्हे राष्ट्रवादीच्या वाटेवर ?
Maharashtra legislative council elections
विधान परिषद निवडणुकीत आमची नाही तर काँग्रेसची…
maharashtra legislative council marathi news
फुटलेल्‍या आमदारांमध्ये सुलभा खोडके यांच्या नावाची चर्चा…त्या म्हणाल्या, “स्थानिक राजकारण…”
Rajendra khupsare, uddhav Thackeray
“आम्ही काय फक्त काँग्रेस – राष्ट्रवादीच्या उमेदवारांची भांडीच घासायची का?”, उद्धव सेना भडकली
all Parties Strategize Independently contest elections, Joint Battle, allied parties, Kolhapur Assembly Elections, Maharashtra assembly election 2024, Parties Strategize Independently contest elections in Kolhapur,
कोल्हापूरमध्ये सर्वच पक्षांची स्वबळाची तयारी
sharad pawar
सत्तेतील लोकांची भूमिका शपथेशी विसंगत यामुळे परिवर्तन अटळ- शरद पवार
Congress state president Nana Patoles criticize Narendra Modi
मोदी हे भ्रष्ट लोकांचे सरदार… ‘मुंह मे राम दिल मे नथुराम’… पटोलेंची कठोर टीका

हेही वाचा >> “अमरावतीत कोणतंही अघोरी कृत्य घडू शकतं”, ईव्हीएम बंद पडल्यामुळे संजय राऊतांचा संशय; म्हणाले, “अचानक सायंकाळी…”

त्या पुढे म्हणाल्या की, आज आमच्या अमरावतीत दुसऱ्या टप्प्यातील मतदान आहे. म्हणून सकाळीच हनुमान चालीसाचं पठण केलं. आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. संस्कृतीनुसार जे चालतं, आरती ओवाळून, डोक्यावर टीळा लावून, हातात साखर देऊन चागंल्या सुरुवातीला बाहेर पाठवलं जातं. आता बाहेर निघाली आहे, त्यामुळे मला वाटतं की देशाप्रती मतदान आहे. त्यामुळे अमरावतीकर १०० टक्के त्यांच्या सूनेला आणि माजी सैनिकाच्या लेकीला मतदान करून आशीर्वाद नक्की देतील. तसंच, सर्व उमेदवारांना माझ्याही शुभेच्छा देईन.”

अमरावतीत तिरंगी लढत

 अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजप, काँग्रेस आणि प्रहार जनशक्ती पक्षात तिरंगी लढत होत आहे. एकूण ३७ उमेदवार रिंगणात असून बहुसंख्य कुणबी-मराठा मतदारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अपक्ष निवडून आलेल्या नवनीत राणा यावेळी भाजपच्या उमेदवार आहेत. काँग्रेसतर्फे बळवंत वानखेडे तर बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीचे दिनेश बुब रिंगणात आहेत. विशेष म्हणजे, बच्चू कडू महायुतीत असूनही त्यांनी राणांविरुद्ध उमेदवार दिला असून राणांचा पराभव हेच आपले ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले आहे.