20 November 2017

News Flash

जाणून घ्या, ‘हंड्रेड डेज’ या रहस्यमय मालिकेची कथा

हंड्रेड डेजची गोष्ट आहे राणी (तेजस्विनी पंडित) आणि धनंजय सरदेसाई (रमेश भाटकर) या जोडप्याची.

October 22, 2016 11:11 AM

1 of 6
‘रात्रीस खेळ चाले’ मधून एका रहस्यमय उत्कंठावर्धक गोष्टीने आणि नाईक कुटुंबाने प्रेक्षकांची मने जिंकली. विशेष म्हणजे केवळ शहरीच नाही तर निमशहरी आणि ग्रामीण भागातील प्रेक्षकही या नव्या वेळेशी आणि नव्या मालिकेशी जोडला गेला. पहिल्या भागापासून सुरु झालेल्या रात्रीस खेळ चाले मालिकेने शेवटच्या भागापर्यंत रहस्याची उत्कंठा कायम ठेवली आता याच वेळेत हंड्रेड डेज ही आणखी एक रहस्यमय मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे ज्यातून रहस्याचा एक नवा थरार बघायला मिळणार आहे. येत्या २४ ऑक्टोबरपासून सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही मालिका शंभर भागांचीच आहे. शंभर दिवसात उलगडणा-या रहस्याचा उत्कंठावर्धक प्रवास या मालिकेतून बघायला मिळणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीमधील दोन लोकप्रिय कलाकार म्हणजेच तेजस्विनी पंडित आणि आदिनाथ कोठारे या मालिकेत मुख्य भूमिकेत बघायला मिळणार आहेत. याशिवाय मालिकेत रमेश भाटकर, अर्चना निपाणकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

First Published on October 22, 2016 1:05 am