वृत्तसंस्था, मेलबर्न
पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवरून गुरुवारी १०० हून अधिक लांब पंख असलेल्या पायलट व्हेलना समुद्रात सोडण्यात आले आहे. तर २९ मरण पावल्या असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियाच्या पार्क्‍स अँड वाइल्डलाइफ सव्‍‌र्हिसने एका निवेदनात म्हटले आहे की, डन्सबरोजवळील टोबी इनलेट येथे १०० हून अधिक लांब पंख असलेल्या व्हेल अडकल्या होत्या. हे वृत्त समजताच वन्यजीव अधिकारी, सागरी शास्त्रज्ञ आणि पशुवैद्यकांची एक टीम घटनास्थळी पोहोचली होती. डन्सबर्ग हे पर्थच्या दक्षिणेस २८५ किलोमीटर अंतरावर समुद्रकिनारी असलेले शहर आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना आधी वाटले होते की ३१ व्हेल मरण पावले आहेत, परंतु जैवविविधता, संवर्धन आणि आकर्षण विभागाने नंतर मृ झालेल्या व्हेलची संख्या २९ असल्याचे सांगितले. मृत व्हेलचे शव शार्कला आकर्षित करू नये यासाठी मृत्यू झालेल्या व्हेलना पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. जहाजे आणि एक स्पॉटर प्लेन सुटका केलेल्या व्हेल किनाऱ्यावर परत येतात का त्याचे निरीक्षण करत होते, असे पार्क्‍स अँड वाइल्डलाइफ सव्‍‌र्हिसच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Kyna Khare, record,
कयना खरे… छोटीशी जलपरी
building islands in the South China Sea
दक्षिण चिनी समुद्रात बेट बांधून व्हिएतनाम वाढवतोय ताकद; चीनची भूमिका काय?
Passenger, Hungary,
मुंबई : बनावट व्हिसाद्वारे हंगेरीला जाणाऱ्या प्रवाशाला पकडले
274 Palestinians killed in Israeli attack
इस्रायलच्या हल्ल्यात २७४ पॅलेस्टिनी ठार; हमासच्या ताब्यातील ४ ओलिसांची सुटका करण्यात यश
panama evacuate its first port
‘या’ देशातील संपूर्ण बेटच जाणार समुद्राखाली; ३०० कुटुंबांचे करणार स्थलांतर, कारण काय?
prajwal revanna
महिन्याभरानंतर भारतात परतलेल्या प्रज्वलला विमानतळावरच अटक, व्हिडिओतील आवाजाचे नमुने गोळा करणार?
man shoots dj oprator in ranchi,
धक्कादायक! मद्य न दिल्याने थेट बारमधील डीजे ऑपरेटरच्या छातीत झाडल्या गोळ्या; जागीच मृत्यू
Nandurbar, accident,
नंदुरबार : पेव्हर ब्लॉक वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरला अपघात अन काय झाले उघड पहा…

व्हेल कशामुळे अडकतात याचे कारण अद्याप शास्त्रज्ञांना सापडलेले नाही. मात्र, असे दिसते की हळूवारपणे उतार असलेल्या, वालुकामय समुद्रकिनाऱ्यांमुळे गोंधळल्या जाऊन त्या अडकतात.