७ जुलै २०१५
- 1 / 7
नवी दिल्लीत पावसाने हजेरी लावल्यानंतर इंद्रधनुष्य पाहावयास मिळाले. (छायाः पीटीआय)
- 2 / 7
गुरगाव येथे योगा सादर करताना पोलीस. (छायाः पीटीआय)
- 3 / 7
आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षेत्रात महासत्ता होण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या अमेरिकेने महिला फुटबॉल विश्वचषकाच्या जेतेपदासह शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. गतविजेत्या जपानला नामोहरम करत अमेरिकच्या महिला संघाने जेतेपदाची कमाई केली. (छायाः पीटीआय)
- 4 / 7
अहमदाबाद जोरदार वारे सुटल्यावर झाड उन्मळून पडल्याने गाडीचा पुरता चेंदा केला. (छायाः पीटीआय)
- 5 / 7
फोर्टमध्ये फिरोजशहा मेहता मार्गावर सोमवारी दुपारी एक बेवारस सुटकेस आढळली. बॉम्बशोधक पथकाने तिची तपासणी केली असता तिच्यात फक्त कागदपत्रे आढळली. काही वेळातच ही सुटकेस एका पालिका अधिका-याची असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे कुणीतरी ही सुटकेस चोरून त्यातले ७० हजार रुपये काढून ती फेकून दिली होती. (छायाः पीटीआय)
- 6 / 7
रशिया दौ-यावर जाताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. (छायाः पीटीआय)
- 7 / 7
विम्बल्डनच्या तिसऱ्या फेरीत रंगलेल्या द्वंद्वांत यंदाच्या वर्षांत जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या सेरेना विल्यम्सने व्हीनस विल्यम्सवर मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. (छायाः पीटीआय)