‘शौहर और बेगम’ चले, अभिनेत्री सना खानने शेअर केले हनिमूनचे फोटो
- 1 / 9
बॉलिवूड अभिनेता सलमान खानची को-स्टार आणि बिग बॉसची स्पर्धक सना खानने काही दिवसांपूर्वी इस्लामसाठी चित्रपटसृष्टी सोडत असल्याचे सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. तिच्या या निर्णयानंतर अनेकांना धक्का बसला होता. पण आता सनाने निकाह केला आहे.(सर्व फोटो सौजन्य - सना खान इन्स्टाग्राम)
- 2 / 9
सना खानने गुजरातमधील सुरत येथील मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला आहे. बिग बॉस फेम एजाज खानने सना आणि मौलाना मुफ्ती अनसशी यांची ओळख करुन दिली असल्याचे म्हटले जात आहे.
- 3 / 9
विमानतळावर फ्लाईटची प्रतिक्षा करत असताना सनाने पती अनस सोबत काढलेला सेल्फी.
- 4 / 9
'शौहर और बेगम' चले असे सनाने या फोटोला कॅप्शन दिले आहे.
- 5 / 9
अनसने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोअरीवर हा फोटो शेअर केला आहे. यामध्ये दोघांनी परस्परांचा हात हातात घेतल्याचे दिसते.
- 6 / 9
काश्मीरमधल्या ज्या हॉटेलमध्ये सना उतरलीय, त्या रुममधला तिने शेअर केलेला फोटो.
- 7 / 9
सना खानने तिच्या रुममधून समोरचे निर्सगाचे सुंदर रुप न्याहाळतानाचा हा फोटो शेअर केला आहे.
- 8 / 9
सनाने हा व्हिडीओ बनवलाय. तिथे अनस अचानक येतो, त्याचा सरप्राईज लूक या फोटोत दिसतो.
- 9 / 9
सनाने २० नोव्हेंबर रोजी मौलाना मुफ्ती अनसशी निकाह केला आहे. सना खानने ‘बिग बॉस’च्या सहाव्या सिझनमध्ये भाग घेतला होता.