Goodbye 2020 : वर्षभरात ‘या’ ७ गाण्यांनी सोशल मीडियावर घातला धुमाकूळ
- 1 / 15
२०२० या वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या. करोनामुळे ओढवलेल्या संकटामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. कलाविश्वावरही त्याचा परिणाम झाला. मात्र, या काळात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी युट्यूबवर अनेक गाण्यांनी धुमाकूळ घातला. त्यामुळे काही गाणी ही २०२० या वर्षातील सुपरहिट ठरली. त्यामुळेच २०२० हे वर्ष गाजवणारी गाणी कोणती ते पाहुयात. ( सौजन्य : जनसत्ता/ युट्यूब व्हिडीओ )
- 2 / 15
गेंदा फूल - २०२० या वर्षातील सर्वात सुपरहिट ठरलेलं गाणं म्हणजे गेंदा फूल. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि बादशाह यांचं हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.
- 3 / 15
या गाण्याला जवळपास ६७३ मिलिअन व्ह्युज मिळाले आहेत.
- 4 / 15
गोवा वाले बीच - बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचं प्रत्येक गाणं सोशल मीडियावर तुफान लोकप्रिय होत असतं. मात्र, तिचं गोवा वाले बीच पे हे गाणं सध्या चांगलंच चर्चिलं जात आहे.
- 5 / 15
या गाण्याला आतापर्यंत युट्यूबवर ३६१ मिलिअन व्ह्युज मिळाले असून या गाण्यात नेहासोबत आदित्य नारायणने स्क्रीन शेअर केली आहे. तर टोनी कक्करने हे गाणं गायलं आहे.
- 6 / 15
इल्लीगन वेपन 2.0 - स्ट्रीट डान्सर ३डी या चित्रपटातील हे गाणं आहे. या गाण्यात अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूरने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.
- 7 / 15
या गाण्याला ३४४ मिलिअन व्ह्युज मिळाले असून हे ओरिजनल गाणं गॅरी संधू यांचं आहे.
- 8 / 15
गर्मी - संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातलेलं गाणं म्हणजे गर्मी. या गाण्याला ३४१ मिलिअन व्ह्यूज मिळाले आहे. या गाण्यात नोरा फतेही झळकली आहे.
- 9 / 15
स्ट्रीट डान्सर ३डी याच चित्रपटातील हे गाणं असून बादशाह आणि नेहा कक्करने हे गाणं गायलं आहे.
- 10 / 15
मुकाबला - स्ट्रीट डान्सर ३डी मधील आणखीन एक गाजलेलं गाणं म्हणजे मुकाबला. या गाण्याला ३१९ मिलिअन व्ह्युज मिळाले आहेत. या गाण्यात वरुण धवन आणि प्रभूदेवा यांनी स्क्रीन शेअर केली आहे.
- 11 / 15
या गाण्यातील प्रभूदेवा यांच्या डान्सने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. यश नारवेकर आणि परंपरा ठाकूर यांनी हे गाणं गायलं आहे.
- 12 / 15
फिर से मचाएंगे - Emiway Bantai च्या फिर से मचाएंगे या गाण्याने युट्यूबवर ३०३ व्ह्युज मिळवले आहेत. युट्यूबच्या लोकप्रिय गाण्यांमध्ये याचा समावेश करण्यात आला आहे.
- 13 / 15
या गाण्याचे बोल सध्या तरुणाईमध्ये लोकप्रिय ठरत आहेत.
- 14 / 15
तारों के शहर - नेहा कक्करचं आणखी एक लोकप्रिय ठरलेलं गाणं म्हणजे तारों के शहर में. या गाण्यात नेहासोबत सनी कौशलने स्क्रीन शेअर केली आहे.
- 15 / 15
हे गाणं नेहा कक्कर आणि जुबीन नौटियाल यांनी गायलं आहे.