‘उखाणा ते पत्नीच्या हातचा आवडता पदार्थ’, रोहित पवारांनी सांगितली सिक्रेट्स
- 1 / 10
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार झी मराठी वाहिनीवरील 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रमात सहभागी झाले होते.
- 2 / 10
या कार्यक्रमात रोहित पवार यांनी त्यांच्या व्यक्तीगत आयुष्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या. या युवा आमदाराबद्दल तरुणांमध्ये मोठे आकर्षण आहे. त्यांनी आवडते चित्रपट, डायलॉग कुठला त्याबद्दल सांगितले. तसेच लग्नाच्यावेळी घेतलेला उखाणा देखील त्यांनी यावेळी घेतला.
- 3 / 10
पत्नीच्या हातचं मेथी, पिठलं आणि बिर्याणी हे पदार्थ आवडतात. पण त्याचवेळी भूक लागल्यावर काहीही चालते हे सुद्धा त्यांनी सांगितले.
- 4 / 10
करोनाकाळात आईकडून चहा बनवायला शिकल्याचे त्यांनी सांगितले. लॉकडाउनमध्ये पत्नीला मी केक बनवायला मदत करत होतो. पण माझ्या मदतीमुळे तिला दोनवेळा केक बनवावा लागल्याचा गंमतीशीर किस्सा त्यांनी सांगितला.
- 5 / 10
हिंदीतील 'चक दे', 'दंगल' हे आवडते चित्रपट आहेत. मराठीतील 'सिंहासन' आणि 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' हा चित्रपट आवडतो. 'गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा' हा चित्रपट तर सध्याच्या परिस्थितीला अनुसरुन असल्याचे त्यांनी सांगितले.
- 6 / 10
राजकीय क्षेत्रात काही वेळा डायलॉग मारावा लागतो. 'ओम शांती ओम' चित्रपटातील 'कोई चीज मनसे चाहो तो पुरी कायनात उसे मिलाने मे जुट जाती हैं", 'पिक्चर अभी बाकी है' हे आवडते डायलॉग असल्याचे त्यांनी सांगितले.
- 7 / 10
राजकीय जीवनात राजकीय विरोध दर्शवला जातो. पण व्यक्तीगत जीवनात मात्र मैत्री ठेवली पाहिजे. आजच्या काळात याच गोष्टीची उणीव जाणवते. राजकारणात वैर ठेवू नये. व्यक्तीगत जीवनात मैत्री जपली पाहिजे असे त्यांनी सांगितले.
- 8 / 10
'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात नगरचे खासदार सुजय विखे पाटील, भाजपा नेत्या पंकजा मुंडे सुद्धा सहभागी झाल्या होत्या. व्यक्तीगत जीवनातील गमती-जमती, आवडी-निवडी आणि काही किस्से या तरुण नेत्यांनी सांगितले.
- 9 / 10
मागच्याच आठवडयात कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघात आणि शेजारी तालुक्यात असलेल्या गावात रात्री आपल्या सहकाऱ्यांसह बिबट्याला पकडण्याच्या कामाचा आढावा घेतला होता.
- 10 / 10
काही कामानिमीत्त रोहित पवार पुण्यातील एका रूग्णालयामध्ये आले होते. काम झाल्यानंतर रोहित पुन्हा आपल्या गाडीतून नियोजीत ठिकाणी जात असताना, या रूग्णालयामध्ये रूग्णांची सेवा करणा-या मावशी त्यांना गेटजवळ भेटल्या. या मावशींनी आवाज दिल्यानंतर रोहित पवार यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली. रोहित पवार यांनी त्या मावशींची विचारपूस केली. त्यानंतर त्या मावशींनी रोहित पवार यांच्याकडे मला तुमच्याबरोबर सेल्फी काढायचा आहे अशी मागणी केली.