सध्या प्रत्येक जण नोकरी शोधण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, नोकरीच्या संख्येत उमेदवारांची संख्या प्रचंड मोठी आहे. त्यामुळे सर्व जण विविध नोकरीसंबंधी ॲप्स वापरून ऑनलाइन पद्धतीने, ईमेलच्या मदतीने नोकरीसाठी CV, आपली माहिती किंवा अर्ज पाठवत असतात. मात्र, कंपन्यांमध्येही दररोज हजारो असे ईमेल्स येत असल्याने प्रत्येकाचा अर्ज वाचला जाईलच याची १०० टक्के खात्री देता येत नाही. परंतु, बंगळुरूमधील एका व्यक्तीने त्याचा CV पाठवण्यासाठी एक भन्नाट शक्कल लढवली आहे.

एक्स [पूर्वीचे ट्विटर] या सोशल मीडिया माध्यमावरून AdityaVSC नावाच्या अकाउंटने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये CV चा एक फोटो आणि त्या फोटोला “कुणीतरी PM या पदाच्या नोकरीसाठी अतिशय विचारपूर्वक लिहिलेला CV आणि कव्हर लेटर मला ब्लिंकिंट [Blinkit] वरून पाठवले आहे. खरंच स्पर्धा खूप तगडी आहे! त्याला आता हेड्स्टार्ट मिळाला आहे”, असे कॅप्शन लिहिले आहे.

हेही वाचा : Video : अमेरिकन यूट्युबरला पडली भारतीय ‘मसाज’ची भुरळ! “याला कामावर घ्या…” चक्क इलॉन मस्ककडे केली मागणी

एनडीटीव्हीच्या एका लेखानुसार, नुकतेच, FairComp या कंपनीचे सीईओ आणि पूर्वी गूगल आणि डोअरडॅशसारख्या बड्या कंपन्यांसाठी काम केलेल्या नोलान चर्च यांनी नोकरीसाठी अर्ज करताना कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, याबद्दल माहिती शेअर केली होती. त्यानुसार “नोकरीचा अर्ज पाठवताना प्रत्येक वाक्य हे २५ शब्दांपेक्षा कमी असले पाहिजे किंवा त्याहूनही कमी. तुम्ही काय काम केले आहे, याबद्दल झटपट माहिती देण्यासाठी याची मदत होते”, असे नोलान यांनी सीएनबीसी मेक इट [CNBC Make It] ला माहिती देताना सांगितल्याचे समजते.

फोटो पाहा :

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“प्रत्येक व्यक्तीचा अर्ज पाहण्यासाठी कंपनीकडे केवळ तीन ते पाच सेकंदांचा अवधी असतो. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि वेळ हाच व्यवसायाचा शत्रूदेखील आहे. आपण जितके भरभर हालचाल करू शकतो, तितक्या पटपट आपण इतर समस्या सोडवू शकतो”, असेही ते म्हणतात. एक्स या सोशल मीडियावर शेअर झालेल्या त्या CV च्या पोस्टवर आत्तापर्यंत २८.८K व्ह्यूज मिळाले आहेत.