‘मुलाचे नाव काय ठेवले?’ सैफ म्हणाला…
- 1 / 10
काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर खानने त्यांच्या दुसऱ्या बाळाचे स्वागत केले.
- 2 / 10
२१ फेब्रुवारी रोजी करीनाने मुंबईमधील ब्रीच कँडी रुग्णालयात बाळाला जन्म दिला.
- 3 / 10
त्यानंतर सोशल मीडियावर सैफ आणि करीना त्यांच्या दुसऱ्या बाळाचे नाव काय ठेवणार? अशा चर्चा सोशल मीडियावर सुरु झाल्या.
- 4 / 10
- 5 / 10
त्यावर सैफने बाळाचे नाव अद्याप ठरवले नाही असे म्हटले आहे.
- 6 / 10
स्पॉटबॉयने दिलेल्या वृत्तानुसार, सैफची आई अभिनेत्री शर्मीला टागोर यांना नातवाला पाहण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण शर्मीला या सध्या दिल्लीमध्ये आहेत आणि करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे त्यांना सध्या मुंबईत येण्याची परवानगी देण्यात आलेली नाही.
- 7 / 10
सध्या सैफ आणि तैमूर बाळासोबत वेळ घालवत आहेत.
- 8 / 10
तसेच तैमूर भावाची विशेष काळजी घेत असल्याचेही सैफने म्हटले आहे.
- 9 / 10
बाळासोबत वेळ घालवण्यासाठी सैफने काही दिवस चित्रीकरणातून ब्रेक घेतला असल्याचे सांगितले आहे.
- 10 / 10
काही दिवसांमध्ये तो पुन्हा आदिपुरुष चित्रपटाचे चित्रीकरण सुरु करणार आहे.