वीणासोबत ब्रेकअप? शिव ठाकरे म्हणाला…
- 1 / 15
छोट्या पडद्यावरील सर्वांत लोकप्रिय व तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी २’चा या शोमधील एक जोडी कामयच चर्चेत असते.
- 2 / 15
ही जोडी म्हणजे शिव ठाकरे आणि वीणा जगताप.
- 3 / 15
बिग बॉसच्या घरात त्या दोघांची ओळख झाली.
- 4 / 15
सुरुवातीला वीणा आणि शिवमध्ये मैत्रीचे होते.
- 5 / 15
पण हळूहळू त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले.
- 6 / 15
बिग बॉस मराठी हा रिअॅलिटी शो संपल्यानंतर ही त्यांनी अनेक कार्यक्रमांना एकत्र हजेरी लावली होती.
- 7 / 15
पण गेल्या काही दिवसांपासून शिव आणि वीणाचा ब्रेकअप झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
- 8 / 15
या चर्चा सोशल मीडियावर एकमेकांसाठी सतत पोस्ट करणारे शिव-वीणा आता एकमेकांविषयी काही बोलत नसल्यामुळे सुरु झाल्या आहेत.
- 9 / 15
तसेच नुकताच शिवचा 'बी रिअल' हा ब्रँड लाँच करण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला वीणा गैरहजर होती.
- 10 / 15
त्यामुळे त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आले.
- 11 / 15
या सर्व चर्चांविषयी बोलताना शिव म्हणाला, 'सध्या आम्ही दोघे आमच्या कामांमध्ये व्यग्र आहोत. मी माझा ब्रँड लाँच करण्याच्या कामात व्यग्र होतो तर वीणा तिच्या मालिकेचे चित्रीकरण करत आहे. आम्ही दोघांनी आमच्या करिअरवर लक्ष केंद्रीत केले आहे.'
- 12 / 15
पुढे तो म्हणाला, 'अंतर वाढले की वादही होताच. पण आमचे प्रेम आणखी दृढ होत चालले आहे. योग्य वेळ येताच आम्ही लग्नाचा विचार करु.'
- 13 / 15
त्यामुळे आता शिव आणि वीणा कधी लग्नबंधनात अडकणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
- 14 / 15
‘बिग बॉस मराठी २’चा या शोच्या विजेतेपदावर शिव ठाकरेनं आपलं नाव कोरले.
- 15 / 15
नुकताच त्याचा 'बी रिअल' हा डिओडरंट ब्रँड लाँच झाला आहे.