अभिज्ञा भावेच्या नव्या लूकवर नेटकरी फिदा
- 1 / 5
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अभिज्ञा भावे. 'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' यांसारख्या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे. उत्तम अभिनयासोबतच अभिज्ञा तिच्या 'तेजाज्ञा' या कपड्यांच्या ब्रँण्डसाठीही प्रसिद्ध आहे.
- 2 / 5
अभिज्ञाने मेहुल पैसोबत लग्नगाठ बांधली. मुंबईमध्ये ६ जानेवारी २०२१ रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात या दोघांचा लग्नसोहळा पार पडला असून कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
- 3 / 5
अभिज्ञा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.
- 4 / 5
अभिज्ञाने नुकतंच फोटोशूट केलं असून त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये अभिज्ञाने फिकट रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये अभिज्ञा भावे अतिशय सुंदर दिसत आहे.
- 5 / 5
सोशल मीडियावर अभिज्ञाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा असून तिच्या प्रत्येक फोटोंवर चाहत्यांकडून लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव होत आहे. (सर्व फोटो : अभिज्ञा भावे / इन्स्टाग्राम)