-
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.
-
सध्या अभिनेत्री सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत आहे. अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री स्कुबा डायव्हिंग करताना दिसत आहे.
-
फोटोंमध्ये सोनाक्षीबरोबर तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालही दिसत आहे.
-
सोनाक्षी आणि जहीर अंदमानमध्ये स्कूबा डायव्हिंग करताना मजा करताना दिसत आहेत.
-
हे फोटो शेअर करताना सोनाक्षीने अंदमानच्या सौंदर्याचे कौतुक केले आहे.
-
या फोटोंमध्ये समुद्राच्या आतील दृश्य पाहण्यासारखे आहे. माशांनी भरलेला हा समुद्र खूप रंगीबेरंगी दिसतोय.
-
सोनाक्षी अनेकदा तिचा बॉयफ्रेंड जहीरसोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत असते.
-
दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, आजपर्यंत या जोडप्याने मीडियासमोर आपल्या प्रेमाची कबुली दिलेली नाही.
-
सोनाक्षी सिन्हाच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटात दिसणार आहे.
(फोटो स्त्रोत: @aslisona/instagram)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप