-
लोकप्रिय बॉलीवूड आणि हॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा बुल्गारीची जागतिक ब्रँड ॲम्बेसेडर असून नुकतंच कंपनीने रोममध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात ती सहभागी झाली होती.
-
बुल्गारीच्या १४० व्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य डिनर आयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये बुल्गारीचे ‘Aeterna’ हे दागिन्यांचे कलेक्शन प्रदर्शित करण्यात आले होते.
-
प्रियांका चोप्राने रोममधील आणखी काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिचा हा लूक पाहून चाहतेही खुश झाले आहेत. बुल्गारी इव्हेंटमधील प्रियांकाचा रोममधील दुसरा लूक पाहूया.
-
यावेळी प्रियांकाने काळ्या रंगाचा शिमरी डीपनेक गाऊन घातला होता. हे फोटो पोस्ट करत प्रियांकाने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “इन हार्ट ऑफ रोम. @bvlgari.” यावेळी तिने आकर्षक पोजमध्ये फोटोशूट केलं आहे.
-
प्रियांकाने घातलेला हा गाऊन लक्झरी फॅशन हाऊस ज्योर्जिओ अरमानीच्या कलेक्शनमधील आहे.
-
स्लीव्हलेस ब्लॅक गाउन, हॉल्टर स्ट्रॅप्स, प्लंगिंग व्ही नेकलाइन, फिट टॉप, फिगर-हगिंग स्कर्ट आणि बॅक स्लिट अशी अनेक वैशिष्ट्ये या ड्रेसमध्ये आहेत.
-
या काळ्या गाऊनमधील एक विशेष भाग म्हणजे याला पॉकेट्स आहेत. प्रियांकाचा हा ड्रेस परफेक्ट पार्टीवेअर ड्रेस आहे.
-
प्रियांकाने निळ्या नीलमणी रत्नांनी सजवलेला डायमंड चोकर, स्टेटमेंट रिंग, टिअरड्रॉप कानातले आणि एक सुंदर ब्रेसलेट घातला होता.
-
यावेळी प्रियांकाने मॉव्ह लिपशेड, न्यूड आयशॅडो, विंग्ड आयलायनर असा मेकअप केला होता. दरम्यान, प्रियांकाचा हा लूक सर्वांनाच आवडला आहे.
![Vat Purnima 2024 Saree Colours](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Vat-Purnima-2024-Saree-Colours.jpg)
Vat Purnima 2024: वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी ‘या’ रंगाची साडी नेसू नये