-
महेश कोठारे दिग्दर्शित ‘जबरदस्त’ चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवणारी अभिनेत्री मानसी नाईक नेहमी चर्चेत असते.
-
मानसी खरंतर ‘वाट माझी बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे अधिक प्रसिद्धीच्या झोतात आली.
-
मानसीनं हिंदी सिनेसृष्टीतही पदार्पण केलं आहे. ‘सिफर’ नावाच्या हिंदी चित्रपटात तिने काम केलं आहे.
-
सध्या मानसी मराठी सिनेसृष्टीपासून दूर असली तरी सोशल मीडियामुळे ती खूप चर्चेत असते.
-
मानसी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. स्वतःचे सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. याच माध्यमातून तिला एखादी संधी मिळले, अशी अपेक्षा असल्यामुळे ती सोशल मीडियावर सातत्याने व्हिडीओ शेअर करत असते, असं तिने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
-
नुकतेच तिने निळ्या रंगाच्या पैठणीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत.
-
केसात गजरा, हातात बांगड्यांचा चुडा, निळ्या पैठणीवर गळ्यात सुंदर साजेसा हार अशा लूकमध्ये मानसी दिसत आहे
-
पण हे सुंदर फोटो शेअर करताना मानसीनं असं काही कॅप्शन लिहिलं आहे, ज्यामुळे तिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा होतं आहेत.
-
निळ्या रंगाच्या पैठणीतले फोटो शेअर करत मानसीनं लिहिलं आहे, “काही पण झालं ना तरी पण तुझी आईच माझी सासू बनणार…”
-
मानसीच्या या कॅप्शनमुळे तिच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अनेक नेटकऱ्यांनी त्याचं आशयाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
-
एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, “लगीन कधी आहे मग?” तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, “मी तुमच्या या खास क्षणाची वाट पाहतोय.”
-
तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने मानसीचे फोटो पाहून प्रतिक्रिया दिली की, “जमलं काय?”
-
काही दिवसांपूर्वी मानसीनं पॅरिसमधील फोटो शेअर केले होते. या फोटोमध्ये राहुल खिस्मतराव नावाचा व्यक्ती दिसला होता.
-
मानसीच्या या फोटोनंतर तो तिचा बॉयफ्रेंड असल्याचा खुलासा झाला. शिवाय ती एका मुलाखतीत देखील म्हणाली होती की, तिच्या या खास व्यक्तीने तिचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात पॅरिसमध्ये साजरा केला होता. त्यामुळे आता मानसीच्या दुसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
सर्व फोटो सौजन्य – मानसी नाईक इन्स्टाग्राम
![If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/New-Project-12-10.jpg?w=300&h=200&crop=1)
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?