-
ज्योतिष शास्त्रामध्ये सर्व ग्रह आणि नक्षत्रांचे स्थान बदलणे सर्व राशींसाठी तसेच देश आणि संपूर्ण जगासाठी खूप महत्वाचे आहे.
-
कारण, सर्व ग्रहांची गती वेगवेगळी असते आणि ते एकमेकांपासून वेगळे होऊन त्यांच्या गतीनुसार एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रस्थान करतात.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी राशी बदलून युती करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो.
-
आता गुरू मीन राशीत प्रवेश करत आहे आणि शुक्र १५ फेब्रुवारीला मीन राशीत प्रवेश करेल. यामुळे १२ वर्षांनंतर मीन राशीमध्ये शुक्र आणि गुरूचा संयोग होईल.
-
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा जेव्हा एखादा ग्रह इतर कोणत्याही ग्रहाशी संक्रमण किंवा युती करतो. त्यावेळी त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो.
-
देवतांचे गुरू बृहस्पति आणि गुरु शुक्राचार्य यांची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु हा ज्ञान आणि वृद्धीचा कारक मानला जातो, तर शुक्र ग्रह धन, वैभव आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो.
-
ही युती सर्व राशीच्या लोकांवर परिणाम करेल. परंतु खास करुन ३ राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता निर्माण होत आहे. त्यांना पैसा, नोकरी, करिअर, प्रेम प्रकरण, व्यवसायात लाभ मिळू शकतो. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
-
गुरू आणि शुक्राची युती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. कारण ही युती तुमच्या राशीतून नवव्या घरात होणार आहे. जे भाग्य आणि परदेशी स्थान मानले जाते. म्हणूनच यावेळी तुम्ही भाग्यवान होऊ शकता. दुसरीकडे, तुम्हाला व्यवसायात धनलाभ होण्याची शक्यता निर्माण होत आहे. धर्म आणि अध्यात्म या विषयांमध्ये तुमची आवड वाढू शकते.
-
कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरु आणि शुक्र यांची युती अनुकूल ठरू शकतो. कारण ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीच्या दुसऱ्या घरात होणार आहे. जे धन आणि वाणीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो. तसेच, ज्यांना नोकरी आणि व्यवसायाच्या क्षेत्रात सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी हा काळ चांगला आहे.
-
करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने गुरू आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण ही युती तुमच्या संक्रमण कुंडलीतील कर्म घरामध्ये तयार होईल. त्यामुळे, यावेळी बेरोजगारांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. तुमचे भाग्यही तुम्हाला पूर्ण साथ देण्याची शक्यता आहे. परदेशात शिक्षण घेण्याची तुमची इच्छाही पूर्ण होऊ शकते.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
येत्या ११ दिवसात ‘या’ ३ राशी होणार श्रीमंत? शुक्र आणि गुरुदेवाच्या युतीने मिळू शकतो प्रचंड पैसा
Jupiter And Venus Conjunction In Meen: देवतांचे गुरू बृहस्पति आणि गुरु शुक्राचार्य यांची युती होणार आहे. ज्योतिषशास्त्रात गुरु हा ज्ञान आणि वृद्धीचा कारक मानला जातो, तर शुक्र ग्रह धन, वैभव आणि ऐश्वर्य यांचा कारक मानला जातो. गुरु आणि शुक्र यांच्या युतीने तीन राशींच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात.
Web Title: Jupiter and venus conjunction in meen these zodiac sign there will be promotion and get huge money marathi astrology pdb