-
सकाळी मुलांसाठी डबा बनवण्यासाठी रोज नवनवीन पौष्टिक पदार्थ कोणते बनवायचे असा प्रश्न पडतो.
अशावेळी तुम्ही ज्वारीच्या कटलेटची ही सोपी रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता. (फोटो सौजन्य: Freepik) -
ज्वारीचे पौष्टिक कटलेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढीलप्रमाणे: (फोटो सौजन्य: Freepik)
-
२ कप ज्वारीचे पीठ, १ कप कोबीचा किस, १ बारीक चिरलेला कांदा, १ कप गाजराचा किस, १ चमचा आलं-लसूण पेस्ट, १ चमचा जिरे, १ चमचा लाल तिखट
बारीक चिरलेला कोथिंबीर, चवीनुसार मीठ , तेल आवश्यकतेनुसार, २ चमचे दही (फोटो सौजन्य: Freepik) -
ज्वारीचे पौष्टिक कटलेट बनवण्याची कृती पुढीलप्रमाणे: (फोटो सौजन्य: Freepik)
-
सर्वप्रथम ज्वारीच्या पिठामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून त्यात पाणी घालून एकजीव करून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
-
मळलेल्या पिठाचे छोटे-छोटे गोळे बनवून त्याला कटलेटचा आकार द्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
आता एका पॅनमध्ये तेल घालून दोन्ही बाजूंनी लालसर होईपर्यंत कटलेट फ्राय करून घ्या. (फोटो सौजन्य: Freepik)
-
त्यानंतर फ्राय केलेले कटलेट एका प्लेटमध्ये काढून सॉसबरोबर सर्व्ह करा. (फोटो सौजन्य: Freepik)
मुलांच्या डब्यासाठी खास ज्वारीच्या पौष्टिक कटलेटची सोपी रेसिपी; पटकन वाचा साहित्य आणि कृती
Easy Recipe For Children: ज्वारीच्या कटलेटची ही सोपी रेसिपी नक्कीच ट्राय करू शकता.
Web Title: Easy recipe for nutritious jwari cutlets specially for children tiffin sap