…अशी लागली ‘मेक इन’ कार्यक्रमात आग
- 1 / 33
‘मेक इन इंडिया’ सप्ताहअंतर्गत रविवारी गिरगाव चौपाटीवर आयोजित करण्यात आलेला ‘महाराष्ट्र रजनी’ कार्यक्रम सुरू असतानाच व्यासपीठाला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात आग लागली. आग कशी लागली याचा संपूर्ण घटनाक्रम.. (छाया- प्रशांत नाडकर)
- 2 / 33
संध्याकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या ‘महाराष्ट्र रजनी’मध्ये तासाभरानंतर पूजा सावंत आणि सहकारी यांचे ‘आता वाजले की बारा’ या लावणी नृत्याचे सादरीकरण सुरू होते. (छाया- प्रशांत नाडकर)
- 3 / 33
पूजा सावंतचे नृत्य सुरू असतानाच त्या वेळी व्यासपीठाच्या खाली आग दिसू लागली. (छाया- प्रशांत नाडकर)
- 4 / 33
काही वेळातच या आगीने रौद्र रुप धारण केले. (छाया- प्रशांत नाडकर)
- 5 / 33
व्यासपीठाला आग लागल्याचे समजताच कलाकारांना तेथून खाली उतरविण्यात आले. (छाया- प्रशांत नाडकर)
- 6 / 33
कार्यक्रम पाहण्यासाठी व्यासपीठासमोर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल सी. विद्यासागर राव, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अन्य दिग्गज सेलिब्रेटी उपस्थित होते. (छाया- प्रशांत नाडकर)
- 7 / 33
आग लागल्याचे दिसताच सर्व मान्यवर व व्यासपीठावरील कलाकारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले. (छाया- प्रशांत नाडकर)
- 8 / 33
कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित असलेल्या पाच हजारांहून अधिक प्रेक्षकांना कोणत्याही चेंगराचेंगरीशिवाय प्रवेशद्वारातून बाहेर काढले गेले. (छाया- प्रशांत नाडकर)
- 9 / 33
अवघ्या दहा मिनिटांच्या आत आग संपूर्ण व्यासपीठावर पसरली. (छाया- प्रशांत नाडकर)
- 10 / 33
अगदी दूरवरूनही आगीचे लोट पाहायला मिळत होते. (छाया- प्रदीप दास)
- 11 / 33
लावणी नृत्याच्या सादरीकरणाआधी व्यासपीठावर शोभेच्या फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली होती. त्या फटाक्यांच्या ठिणग्यांनी ही आग लागली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (छाया- प्रशांत नाडकर)
- 12 / 33
कार्यक्रमस्थळाजवळून प्रेक्षकांना लवकरात लवकर दूर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले. मात्र तरीही या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. (छाया- प्रशांत नाडकर)
- 13 / 33
गिरगाव चौपाटीवर जोरदार वाऱ्यामुळे आग आटोक्यात आणण्यात अडथळे येत होते. (छाया- प्रशांत नाडकर)
- 14 / 33
आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणीही जखमी झाले नाही. मुख्यमंत्र्यांनी पुन्हा घटनास्थळ गाठून आग आटोक्यात येईपर्यंत तेथे तळ ठोकला. आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले असून मेक इन इंडियाच्या कार्यक्रमात कोणतेही बदल होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (छाया- प्रशांत नाडकर)
- 15 / 33
व्यासपीठाच्या ठिकाणी सात मोठय़ा क्रेन्स लावण्यात आल्या होत्या. या क्रेन्सवरील मोठे लाइट्सही आगीत खाक झाले. (छाया- प्रशांत नाडकर)
- 16 / 33
संपूर्ण व्यासपीठ आगीत खाक. (छाया- प्रशांत नाडकर)
- 17 / 33
कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग विझवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आणखी दहा बंब मागवण्यात आले होते. (छाया- प्रशांत नाडकर)
- 18 / 33
कार्यक्रमस्थळाजवळून प्रेक्षकांना लवकरात लवकर दूर जाण्यासाठी वाहतूक व्यवस्थापन करण्यात आले. मात्र तरीही या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. (छाया- प्रशांत नाडकर)
- 19 / 33
पोलिसांनी तत्परता दाखवून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाच हजारांहून अधिक प्रेक्षकांना कोणत्याही चेंगराचेंगरीशिवाय प्रवेशद्वारातून बाहेर काढले. (छाया- प्रशांत नाडकर)
- 20 / 33
लाईट्ससह संपूर्ण व्यासपीठ आगीत खाक झाले. (छाया- प्रशांंत नाडकर)
- 21 / 33
व्यासपीठीला आग लागल्यानंतर पोलिसांनी त्वरित सर्व कलाकारांना सुरक्षित ठिकाणी नेले. (छाया- प्रशांत नाडकर)
- 22 / 33
गिरगाव चौपाटीवरील आगीचे लोट दूरवरूनही पाहता येत होते. (छाया- प्रशांत नाडकर)
- 23 / 33
दरम्यान, या कार्यक्रमाला अनेक बॉलीवूड दिग्गजांनी उपस्थिती लावली होती. (पीटीआय)
- 24 / 33
बॉलीवूड अभिनेता आमीर खान कार्यक्रमाला उपस्थित होता.
- 25 / 33
ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी देखील उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले.
- 26 / 33
मेक इन इंडियाला उद्देशून बॉलीवूड महानायक अमिताभ बच्चन यांनी मराठमोळ्या नृत्यासह यावेळी छोटेखानी सादरीकरण केले. (छाया- प्रशांत नाडकर)
- 27 / 33
महानायक अमिताभ बच्चन.
- 28 / 33
शर्थीच्या प्रयत्नानंतर व्यासपीठाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाला यश आले. (पीटीआय)
- 29 / 33
कार्यक्रमाच्या ठिकाणी असलेल्या अग्निशमन दलाच्या चार बंबांनी आग विझवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आणखी दहा बंब मागवण्यात आले होते.
- 30 / 33
‘मेक इन इंडिया’ उपक्रमाअंतर्गत ठरलेले अन्य कार्यक्रम पार पाडताना अधिक काळजी घेण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
- 31 / 33
सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवीतहानी झालेली नसली तरी आगीमुळे लाखोंचे नुकसान झाले.
- 32 / 33
फटाक्यांच्या ठिणग्यांनी ही आग लागली असल्याची शक्यता.
- 33 / 33
कार्यक्रमाचा संपूर्ण व्यासपीठ जळून खाक.