७०० ते ८०० कोटी संपत्तीच्या प्रश्नावर प्रताप सरनाईक म्हणाले….
- 1 / 10
"दिल्ली आणि महाराष्ट्राच्या लढाईत प्रताप सरनाईकचा तानाजी झालाय. पण ते तानाजी मालुसरे १६ व्या शतकातील होते. हा तानाजी २१ व्या शतकातला आहे. ते तानाजी रयतेचे रक्षण करताना धारातीर्थी पडले होते. पण हा तानाजी समर्थपणे परिस्थितीला सामोरा जाईल" असे शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
- 2 / 10
विरोधकांकडून प्रताप सरनाईक यांची ७०० ते ८०० कोटींची संपत्ती असल्याचा आरोप करण्यात येतो, त्या प्रश्नावर सरनाईक म्हणाले की, माझी संपत्ती ७०० ते ८०० कोटी असेल तर आनंदच आहे.
- 3 / 10
मला भाजपाच्या नेत्यांना एकच गोष्ट सांगायची आहे, देशात प्रामुख्याने महाराष्ट्रात राजस्थानातून आलेले मंगलप्रभात लोढा, भाजपाचे आमदार पराग शाह ज्यांनी महापालिका निवडणुकीला ५ हजार कोटीची संपत्ती दाखवली त्यांची चौकशी केली का? असा सवाल केला.
- 4 / 10
उत्तर प्रदेशातून आलेले ठाकूर, तिवारी, पश्चिम बंगालमधून आलेले अर्णब गोस्वामीची १२०० कोटीची संपत्ती आहे. हिमाचल प्रदेशातून आलेल्या मुलीने मुंबईत करोडोंची संपत्ती जमवली, तिची चौकशी केली का ? असा सवाल सरनाईक यांनी केला केला.
- 5 / 10
मी रिक्षा चालवायचो, ऑमलेटची गाडी सुद्धा चालवली. पण तीस वर्षात प्रत्येक कायद्याचं पालन करुन इथपर्यंत पोहोचलो आहे. त्याचा मला अभिमान आहे असे सरनाईक म्हणाले.
- 6 / 10
भाजपाची केंद्रात सत्ता आहे. जीएसटी, ईडी, इन्कम टॅक्स सारख्यामोठया संस्था त्यांच्या ताब्यात आहेत. त्यांनी चौकशी करावी, मी प्रत्येक चौकशीला सामोरा जायला तयार आहे असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
- 7 / 10
हे काय चालू आहे ते सर्वसामान्य जनता जाणते. टॉप्स ग्रुपचे प्रमुख राहुल नंदा आणि ईडीच्या अटकेत असेलेल अमित चांदोले गेल्या २०-२२ वर्षापासून माझे चांगले मित्र आहेत. पण त्यांच्याबरोबर माझे व्यावसायिक, आर्थिक संबंध नाहीत असा दावा सरनाईक यांनी केला. संबंध नाहीत.
- 8 / 10
ईडीकडून बोलावणं येईल, तेव्हा चौकशीला सामोर जायला मी तयार आहे. हे कॉर्पोरेट वॉर आहे. आरोपी-फिर्यादी कोण कळलेलं नाही. प्रताप सरनाईकचं फिर्यादीमध्ये नावच नाही असे त्यांनी सांगितले.
- 9 / 10
मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी माणसाविषयी येऊन, कोण येऊन आगपाखड करणार असेल तर प्रताप सरनाईक त्याला सोडणार नाही. त्यासाठी मला फाशी देणार असतील तरी, मी तयार आहे असे सरनाईक यांनी सांगितले.
- 10 / 10
प्रताप सरनाई कालही तोच होता, आजही तोच आहे आणि उद्याही तोच राहिलं. या सर्वात आमच्या मुलाबाळाचा काय संबंध आहे? आमच्या बायाका मुलांना त्रास देणं योग्य नाही असे त्यांनी सांगितले.