२३ वर्षीय सौंदर्यवतीची सामूहिक बलात्कारानंतर हत्या; फोर स्टार हॉटेलमधील बाथटबमध्ये सापडला मृतदेह
- 1 / 16
फिलिपिन्समधील एका सौंदर्यवतीवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे फिलिपिन्समधील महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील प्रश्न सोशल नेटवर्किंगवर उपस्थित केले जात आहे. क्रिस्टीन डासेरा असं या ब्यूटी क्वीनचं नाव आहे.
- 2 / 16
क्रिस्टीनचा मृतदेह पोलिसांना हॉटेलमधील बाथरुममध्ये आढळून आला. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी हा प्रकार घडला. तेव्हापासून क्रिस्टीनचा मृत्यू ही फिलिपिन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
- 3 / 16
क्रिस्टीनवर सामुहिक बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दिली आहे.
- 4 / 16
२३ वर्षीय क्रिस्टीन ही ब्यूटी क्वीन होती. ती सोशल नेटवर्किंगवरील तिच्या फोटोंमुळे कायमच चर्चेत असायची.
- 5 / 16
सध्या क्रिस्टीन ही फिलिपिन्स एअरलाइन्ससाठी फ्लाइट अटेंडंट म्हणून काम करत होती.
- 6 / 16
क्रिस्टीनीचा मृतदेह मकाती शहरातील एका फोर स्टार हॉटेलमधील बाथरुमच्या बाथटबमध्ये आढळून आला.
- 7 / 16
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासामध्ये क्रिस्टीनच्या शरिरावर वार करण्यात आल्याचं दिसून आलं आहे. तिच्या शरीरावर काही खोल जखमा दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.
- 8 / 16
क्रिस्टीनवर धारधार वस्तूने वार केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. क्रिस्टीनच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर तो कुटुंबियांना सोपवण्यात आला.
- 9 / 16
शवविच्छेदनाचा अहवालामध्ये मुख्य धमनी फुटल्याने क्रिस्टीनचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र क्रिस्टीनच्या आईने या अहवालासंदर्भात शंका उपस्थित केली आहे.
- 10 / 16
'हेडस्टार'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये क्रिस्टीनची आई शॅरॉन डासेरा यांनी मी हा अहवाल मान्य करणार नाही. तुम्ही तिच्या मृतदेहाकडे एका आईच्या नजरेतून पाहिल्यास तिच्यावर किती अत्याचार झाले असतील याचा अंदाज लावता येईल, असं शॅरॉन म्हणाल्या आहेत.
- 11 / 16
क्रिस्टीनचा जन्म दवाओ शहरात झाला आङे. ती २०१७ साली मिस सिल्वा दवाओ या सौंदर्यवतींच्या स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक पटकावला होता. तर मटिया एनजी दावो २०१९ मध्ये ती अंतिम स्पर्धकांपैकी एक होती.
- 12 / 16
पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असून सध्या ते क्रिस्टीनच्या सर्वात जवळच्या ११ व्यक्तींची चौकशी करत आहेत. यापैकी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांची चौकशी केली आहे.
- 13 / 16
क्रिस्टीनच्या मृत्यूमुळे देशभरामध्ये संतापाची लाट असल्याने पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी वेगवेगळ्या टीम तयार केल्या असून या हत्या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास केला जात असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
- 14 / 16
सोशल नेटवर्किंगवरही क्रिस्टीनच्या मृत्यूनंतर अनेकांनी तिला न्याय मिळाला पाहिजे असं म्हटलं आहे.
- 15 / 16
ट्विटरवरही #justiceforchristinedacera हा हॅशटॅग वापरुन क्रिस्टीनच्या आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली जात आहे.
- 16 / 16
सॅण्टोस शहरातील फॉरेस्ट लेक मेमोरियल पार्कमध्ये क्रिस्टीनच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तिचे जवळचे मित्रमंडळी आणि कुटुंबीय उपस्थित होते. (सर्व फोटो : instagram/xtinedacera वरुन साभार)