-
२२ जानेवारी रोजी अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होत असताना इकडे महाराष्ट्रात शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा करण्याचा निर्णय घेतला.
-
नाशिकमध्ये काळाराम मंदिरात दर्शन घेत असताना उद्धव ठाकरेंच्या लुकने अनेकांचे लक्ष वेधले. स्व. बाळासाहेबांप्रमाणेच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, भगवा सदरा त्यांनी परिधान केला होता.
-
उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी पंचवटीतील प्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शन घेऊन महाआरती केली.
-
श्री काळाराम देवस्थानच्या पुजाऱ्यांनी महाआरती आणि संकल्पपूर्तीनंतर ठाकरे कुटुंबियांचा सत्कार केला.
-
तत्पूर्वी नाशिक शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला उद्धव ठाकरेंनी अभिवादन केले. यावेळी परिसरात शिवसैनिकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले.
-
त्यानंतर रामकुंड गोदाघाटावरही उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी आरती केली.
-
ठाकरे कुटुंबियांना भेटण्यासाठी गोदाघाटावरही लोकांची आणि कार्यकर्त्यांची अशी गर्दी दिसली.
-
काळाराम मंदिरात येण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी नाशिकमधील स्वा. सावरकर यांचे जन्मगाव भगुर येथील स्मारकाला भेट दिली होती.
-
शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर जनता आमच्याबाजूने आहे, असे उद्धव ठाकरे यांच्याकडून सातत्याने सांगण्यात येते. त्याची प्रचिती नाशिकमध्ये पाहायला मिळाली.
-
रामकुंडाचे दर्शन घेत असताना कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे पोलिस आणि शिवसैनिक यांच्यात काही काळ संघर्षही झाला.
-
रामकुंडावर शिवसैनिकांनी एकच गर्दी केल्यामुळे अशापद्धतीने रामकुंड लोकांच्या उपस्थितित फुलून गेल्याचे दिसत होते.

IND vs ENG: “इंग्लंडच्या गोलंदाजांनी माझ्या शरीराच्या दिशेने…”, रोहित शर्माचं शतकाबाबत मोठं वक्तव्य; भारताच्या विजयानंतर काय म्हणाला?