Maharashtra Political News Today : महााष्ट्रासह देशभरात दुसऱ्या टप्प्याचं मतदान पार पडलं असलं तरी महायुतीच्या जागावाटपाचे घोंगडे अद्यापही भिजतच आहे. त्यामुळे महायुतीत कोणाच्या वाट्याला किती जागा मिळणार आणि कोणत्या जागेवरून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. यंदाची लढत थेट महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी असणार आहे, त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक अटीतटीची ठरणार आहे. दरम्यान, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता मोठा दावा केला आहे. लखनऊमध्ये कोणाचीतरी २०० एकर जमीन आयकर विभागाने जप्त केली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. यावरून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यासह राज्यभरातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिवर वाचा.

Live Updates

Marathi News Today, 29 April 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

19:30 (IST) 29 Apr 2024
‘सगेसोयरे’ ज्यांना मान्य, त्यांच्या पाठीशी मराठा समाज; धाराशिव दौर्‍यात मनोज जरांगे-पाटील यांचे मत

धाराशिव : सगेसोयरे कायद्याच्या बाजूने कोण होते, आणि विरोधक कोण होते? हे मराठा समाजाला माहिती आहे. त्यामुळे या निवडणुकीत जे सगेसोयरे कायद्याच्या बाजूने आहेत, त्यांना मराठा समाज सहकार्य करेल आणि मराठाद्वेषी आणि सगेसोयरे कायद्याला विरोध करणार्‍यांना या निवडणुकीत पाडल्याशिवाय मराठे स्वस्थ बसणार नाहीत, अशी प्रतिक्रिया मराठायोध्दा मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.

वाचा सविस्तर...

19:30 (IST) 29 Apr 2024
लोकसभेची एकही जागा एकनाथ शिंदे, अजित पवार गटाला मिळणार नाही; काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा दावा

कोल्हापूर: राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पूरक वातावरण निर्माण झाला आहे. ठिकठिकाणी उमेदवारांना मतदार जनतेकडून चांगला आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला एकही जागा जिंकता येणार नाही, असा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केला.

वाचा सविस्तर...

19:11 (IST) 29 Apr 2024
सुनेला परकी म्हणणार्‍या लोकांना हद्दपार करा

धाराशिव : काही लोक सुनेला परकी म्हणतात. त्यामुळे आपल्या सुनेला मतदान करून धाराशिवच्या लेकीच्या अपमानाचा बदला घ्या. सुनेला परकी म्हणणार्‍या लोकांना हद्दपार करा, असे आवाहन राज्याचे कृषी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केले.

धाराशिव लोकसभा मतदार संघातील माहायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ रविवारी रात्री तुळजापूर शहरात पार पडलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपा नेते सुनील चव्हाण, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विशाल रोचकरी, गोकुळ शिंदे, अमर कदम-परमेश्वर आदी उपस्थित होते.

18:51 (IST) 29 Apr 2024
मतांच्या ध्रुवीकरणाचे विरोधकांचे मनसुबे यशस्वी होणार नाही, भाजप आमदार प्रविण दरेकर यांचे मत

अलिबाग- विरोधकांकडे विकासाचे कुठलेच मुद्दे शिल्लक राहीलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू आहे. मात्र रायगडचा अल्पसंख्याक सुज्ञ असून मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न यशस्वी ठरू देणार नाही असे मत भाजपचे आमदार प्रविण दरेकर यांनी व्यक्त केले. ते अलिबाग येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.

गेल्या पाच वर्षात केंद्रसरकारने विवीध कल्याणकारी आणि वैयक्तिक लाभाच्या योजना राबविल्या, या योजना राबवितांना धर्म, समाज यात कधीच भेदभाव केला नाही. त्यांचा लाभ सर्व समाजातील सर्व धर्मातील लोकांना झाला. मोदी सरकारची मोफत धान्य योजना जशी हिंदू समाजासाठी होती तशी ती अल्पसंख्याक आणि बहुजन समाजासाठीही होती. त्यामुळे विरोधकांनी मतांच्या ध्रुवीकरणाचे कितीही प्रयत्न केले तरी जनता त्यांच्या प्रयत्नांना बळी पडणार नाही. महायुतीचे उमेदवार असलेल्या सुनील तटकरेंना अल्पसंख्याक समाजही मोठ्या संख्येनी मतदान करेल असा विश्वास दरेकर यांनी व्यक्त केला.

18:01 (IST) 29 Apr 2024
‘जेल का जवाब वोट से’, महाविकास आघाडीच्या रॅलीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांचीही हजेरी

मुंबई : आम आदमी पक्षाचे प्रमुख (आप) आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात आहेत. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधातला संताप आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमटत आहे.

सविस्तर वाचा...

17:42 (IST) 29 Apr 2024
नागपूर : उपराजधानीत टोळीयुद्ध भडकले, चार तासांत दोन हत्याकांड

नागपूर : गुन्हेगारांनी पुन्हा एकदा तोंड वर काढले असून उपराजधानीत गुन्हेगारांमध्ये टोळीयुद्ध भडकले आहे. गेल्या चोवीस तासांत शहरात दोन हत्याकांड उघडकीस आले आहे. पारडीत गुन्हेगारांच्या टोळीने प्रतिस्पर्धी टोळीवर तलवारीने हल्ला चढवला. एका युवकाचा भरचौकात खून करून पलायने केले.

वाचा सविस्तर...

17:42 (IST) 29 Apr 2024
नागपूरची जागा भाजपसाठी सोपी नाही! गडकरी विरुद्ध ठाकरेंमध्ये अटीतटीची लढत

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काँग्रेसचे पश्चिम नागपूरचे आमदार विकास ठाकरे यांच्यात नागपूर लोकसभा मतदारसंघात अटीतटीची लढत आहे. गडकरी आणि ठाकरे यांच्यातील जय-पराजयामधील फरक केवळ ३० ते ४० हजारांवर येण्याची शक्यता आता वर्तवली जावू लागली आहे.

वाचा सविस्तर...

17:40 (IST) 29 Apr 2024
बुलढाणा : डीजेच्या तालावर वऱ्हाडी बेभान थिरकत होते, अचानक सगळे सैरावैरा पळू लागले…

बुलढाणा : लग्नाची वरात निघाली, डीजेच्या आवाजावर सगळी वऱ्हाड मंडळी थिरकत होती. मात्र अचानकच वऱ्हाडी सैरावैरा पळायला लागली. मंडळीना वरातीतून पळावच लागलं. त्याचं झालं असं की रात्री साडेआठ च्या सुमारास जिथून वरात निघाली नेमकं तिथेच असलेल्या एका झाडावर मधमाशांच मोठे पोळं होते. डीजेचा दणदणाट आणि तीव्र कंपनामुळे मधमाशांचे पोळ ‘उठले’. चवताळलेल्या मधमाशांनी वऱ्हाडी मंडळींवर हल्ला चढवला.

वाचा सविस्तर...

17:17 (IST) 29 Apr 2024
कोकण रेल्वे प्रवासात दरवाजात उभे राहून मोबाईल हातात ठेवणे महाग पडले

पनवेल : कोकण रेल्वेने रत्नागिरी ते मुंबई या पल्यावर रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला दरवाजात उभे राहून हातात मोबाईल फोन ठेवणे महाग पडले आहे. आठवडाभरापूर्वी (ता. २२) २८ वर्षीय अजित गोवलकर हे दापोली ते मुंबई असा प्रवास करताना ते दरवाजाजवळ उभे होते.

सविस्तर वाचा...

17:15 (IST) 29 Apr 2024
“इंडिया आघाडीच्या हाती सत्ता गेल्यास पुन्हा भ्रष्टाचार, दहशतवाद अन् फाळणीचा धोका”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इशारा

त्यांच्या हाती एवढ्या मोठ्या देशाची सत्ता सोपविल्यास देशात पुन्हा भ्रष्टाचार आणि दहशतवाद होऊन देशाची फाळणी होईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.

सविस्तर वाचा...

16:57 (IST) 29 Apr 2024
खेडमध्ये डॉ. कोल्हे आणि आढळराव-पाटील दोघांनीही धरले एकमेकांचे पाय

पिंपरी : शिरुर लोकसभा मतदारसंघातील प्रचारात रंगत वाढली असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव-पाटील हे दोघे सोमवारी (२९ एप्रिल) खेडमध्ये एकत्र आले.

सविस्तर वाचा...

16:56 (IST) 29 Apr 2024
मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव मोटार उलटून दोघांचा मृत्यू; तिघे गंभीर जखमी

लोणावळा : मुंबई-पुणे महामार्गावर टाकवे गावाजवळ भरधाव मोटार उलटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना मध्यरात्री घडली. अपघातात तिघे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविस्तर वाचा...

16:55 (IST) 29 Apr 2024
नागपूर : चिमुकला रस्त्यावर धावत आला अन्…

नागपूर : आईवडिलांसह लग्नात आलेला पाच वर्षीय चिमुकला रस्त्यावर धावत आला. भरधाव जात असलेल्या कारने त्याला जबर धडक दिली. या धडकेत चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ वाजता वेळाहरी-बेसा रोडवर घडली. चिरायू अनोद पवार (रा. राजीवनगर, वडधामना) असे अपघातात ठार झालेल्या मुलाचे नाव आहे.

वाचा सविस्तर...

16:01 (IST) 29 Apr 2024
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज ‘दिग्विजय पगडी’ने होणार सत्कार

दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी आपल्या मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

15:26 (IST) 29 Apr 2024
नागपूर विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी

नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचार जोरात सुरू असताना सोमवारी सकाळी नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ई- मेल नागपूर विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला.

वाचा सविस्तर...

15:20 (IST) 29 Apr 2024
नागपूर : इंस्टाग्राम मित्राचा तरुणीवर लैंगिक अत्याचार

नागपूर : अमरावतीच्या एका तरुणाने इंस्टाग्रामवर शहरातील तरुणीशी मैत्री केली. प्रेमाच्या जाळ्यात अडकवून दोन वर्षांपर्यंत तिचे लैंगिक शोषण केले. लग्नासाठी बोलणी केली असता तिला मारहाण केली. तसेच बदनामी करण्याची धमकी देऊ लागला. पीडितेने पोलिसात तक्रार केली.

वाचा सविस्तर...

15:18 (IST) 29 Apr 2024
डोंबिवलीत कुंभारखाणपाडा येथे ‘महारेरा’ गुन्ह्यातील बेकायदा इमारत भुईसपाट

या कारवाईने भूमाफियांना मोठा तडाखा बसला आहे. या कारवाईने भूमाफियांचे सुमारे दोन ते तीन कोटीचे नुकसान झाल्याचे समजते.

सविस्तर वाचा...

15:17 (IST) 29 Apr 2024
आदित्य ठाकरे म्हणाले, “उमेदवारीबाबत मिंधेंना गुजरातमधून अद्याप आदेश नाही”

गद्दारांचे हाल बघा काय झाले आहेत आणि भाजपने त्यांना त्यांची लायकी दाखवून दिली आहे, असा टोला शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात लगावला.

सविस्तर वाचा...

15:02 (IST) 29 Apr 2024
कळंबोली लोखंड बाजारातील गोदाम फोडून २६ लाखांचा माल मुंबईला विकणाऱ्याला अटक

पनवेल : मागील तीन वर्षात कळंबोली येथील लोखंड पोलाद बाजारातील गोदामांमधून लाखो रुपयांचा माल चोरल्याने व्यापारी त्रस्त होते. अनेक गुन्हे घडल्यानंतरही पोलिसांना आरोपींना पकडण्यात अपयश येत असल्याने नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी यामध्ये लक्ष घालण्याची मागणी व्यापाऱ्यांकडून केली जात होती.

सविस्तर वाचा...

15:01 (IST) 29 Apr 2024
जळगाव जिल्ह्यात केलेली चार विकास कामे दाखवा…भाजप उमेदवार रक्षा खडसेंना जाब

जळगाव : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू झाला असून, उमेदवारांनी प्रचारालाही वेग दिला आहे. आता प्रचारासाठी अवघे १२ दिवस उरले आहेत. या निवडणुकीत प्रचारावेळी जनता आता मत मागण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांना थेट प्रश्न विचारु लागल्याचे दिसून येत आहे.

सविस्तर वाचा...

14:53 (IST) 29 Apr 2024
गृहप्रकल्पातील सर्व सुविधांचाही तपशील देणे विकासकांसाठी बंधनकारक, महारेराकडून आदेशाचा मसुदा प्रसिद्ध

पार्किंगनंतर आता प्रकल्पातील खेळ आणि मनोरंजन यासंबंधीच्या सुविधांचा संपूर्ण तपशील आदर्श विक्री करारात जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

14:10 (IST) 29 Apr 2024
यवतमाळजवळ भोयर घाटात डिझेल टँकर उलटून आग; एक जण ठार, दोघे होरपळले…

यवतमाळ : येथून जवळच असलेल्या भोयर घाटात डिझेल टँकर उलटून भीषण आग लागली. या घटनेत टँकरमधील एकाचा मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीररित्या भाजले. ही घटना यवतमाळ-दारव्हा मार्गावरील भोयर घाटात आज सोमवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास घडली.

वाचा सविस्तर...

14:02 (IST) 29 Apr 2024
लोकसत्ता इम्पॅक्ट : ‘ऑनलाईन’ क्रिकेट सट्टा चालविणाऱ्या मोठ्या बुकिंसह १० जणांवर गुन्हा; गडचिरोली पोलिसांची धडक कारवाई

गडचिरोली : गेल्या दहा वर्षांपासून जिल्ह्यात ‘आयपीएल’ क्रिकेटवर राजरोसपणे सुरु असलेल्या ऑनलाईन जुगारावर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करीत अहेरी व आलापल्ली येथील १० आरोपीवर गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी ‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उजेडात आणले होते. त्यानंतर पोलिसांनी लगेच ही कारवाई केली.

वाचा सविस्तर...

13:56 (IST) 29 Apr 2024
ठाण्यात राजन विचारेंच्या शक्तीप्रदर्शनाला जुन्या जाणत्यांची साथ, इंडिया आघाडीतील घटक पक्षही सहभागी

ठाणे, नवी मुंबई, मिरा-भाईंदरसह आसपासच्या शहरांमधील साठी, सत्तरीकडे झुकलेले अनेक जुने शिवसैनिकांचे जथ्थे विचारे यांच्या मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी येत होते.

सविस्तर वाचा...

13:36 (IST) 29 Apr 2024
कल्याण लोकसभेत वैशाली दरेकर यांच्या प्रचार दौऱ्याकडे ज्येष्ठ शिवसैनिकांची पाठ

राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्यावर शिवसेनेतील एक गट राज ठाकरे यांच्या सोबत गेला. त्यामध्ये दरेकर यांचा समावेश होता.

सविस्तर वाचा...

13:30 (IST) 29 Apr 2024
“मोदींना फक्त चारच जाती माहीत आहेत, पहिली म्हणजे…”, नारायण राणेंचं विधान

महिला, युवा, शेतकरी आणि गरीब या चार जाती पंतप्रधान नरेंद्र मोदी मानतात. या चार जातींसाठी आमचं केंद्रातलं सरकार काम करेल - नारायण राणे</p>

13:17 (IST) 29 Apr 2024
अरेरे! हे काय, डुकरं पटापट मरताहेत आणि प्रशासन मात्र ढिम्म…

वर्धा: एखाद्या रोगाची साथ पसरली की त्यावर अंकुश ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न प्रशासनाकडून युद्ध पातळीवार केल्या जातो. तसेच पाळीव जनावरंबाबतही दक्षता घेऊन आवश्यक ते उपाय योजल्या जातात. मात्र इथे रोज दहा डुकरांचा मृत्यू होत असून त्यामुळे नागरिक चांगलेच त्रस्त झाल्याचे चित्र आहे.

वाचा सविस्तर...

12:52 (IST) 29 Apr 2024
मुंबई: सीएसएमटी येथे लोकल घसरली

हार्बर मार्गावरून पनवेल ते सीएसएमटी धावणाऱ्या लोकलचा एक डबा सीएसएमटी रेल्वे स्थानकापूर्वी रुळावरून घसरला.

सविस्तर वाचा...

12:41 (IST) 29 Apr 2024
कोल्हापूरमध्ये दोन्ही उमेदवारांसाठी मुख्यमंत्र्यांचे अथक प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक भलतीच गांभीर्यांनी घेतली आहे.

सविस्तर वाचा...

12:40 (IST) 29 Apr 2024
CSMT स्थानकात लोकल रुळावरून घसरली, हार्बर सेवा विस्कळीत; वेळापत्रक कोलडमडले!

पनवेलहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक दोनवर लोकल येत असताना अचानक घसरली. यामुळे हार्बर मार्गावरील लोकल मस्जिदपर्यंत थांबवण्यात आल्या आहेत. तर, काही लोकल वडाळ्यापर्यंत मर्यादित करण्यात आल्या आहेत. यामुळे हार्बर सेवा विस्कळीत झाली असून वेळापत्रक कोलमडले आहे. सकाळी ११.३५ मिनिटांनी हा अपघात झाला. या अपघातात सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. तर, मध्य मार्गावरील वाहतूक सेवेत कोणताही बदल झालेला नाही.

https://twitter.com/Central_Railway/status/1784837733720150173

EKnath Shinde and Uddhav Thackeray (1)

Marathi News Today, 29 April 2024 : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर