वेल डन! भारतात उपलब्ध होणारी अमेरिकन कंपनी नोव्हाव्हॅक्सची लस मानवी परीक्षणात यशस्वी
- 1 / 15
मॉर्डना पाठोपाठ अमेरिकेत नोव्हाव्हॅक्स लस निर्मितीमध्ये आघाडीवर आहे. नोव्हाव्हॅक्सने करोना व्हायरस विरोधात लस विकसित केली असून या लसीच्या सध्या मानवी चाचण्या सुरु आहेत.
- 2 / 15
नोव्हाव्हॅक्सने विकसित केलेल्या प्रायोगिक लसीचे फेज १ चे मानवी चाचणीचे निष्कर्ष खूपच समाधानकारक आहेत. या रिझल्टसनी नोव्हाव्हॅक्सच्या लसी बद्दलच्या अपेक्षा खूपच उंचावल्या आहेत. सीजीटीएन संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. (Photo: Reuters)
- 3 / 15
मागच्या आठवडयात नोव्हाव्हॅक्स लसीच्या पहिल्या फेजचे निष्कर्ष समोर आले. (Photo: AP)
- 4 / 15
NVX-CoV2373 लसीचे दोन डोस दिल्यानंतर तंदुरुस्त स्वयंसेवकांच्या शरीरात मोठया प्रमाणावर अँटीबॉडीज तयार झाल्या. करोनामुक्त नागरिकांच्या शरीरात आढळणाऱ्या अँटीबॉडीजेपेक्षा हे प्रमाण जास्त होते असे कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे या लसीबद्दलच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
- 5 / 15
१८ ते ५९ वयोगटातील तंदुरुस्त स्वयंसेवकांवर चाचणी करण्यात आली. त्यांना पाच आणि २५ मायक्रोग्रॅमचे दोन डोस देण्यात आले. (Photo: Reuters)
- 6 / 15
लस दिल्यानंतर कोणावरही गंभीर दृष्परिणाम दिसले नाहीत असे नोव्हाव्हॅक्सने सांगितले.
- 7 / 15
काही रुग्णांमध्ये सौम्य साइड इफेक्ट आढळून आले. यात इंजेक्शन दिलेल्या जागी दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे, मसल पेन अशा तक्रारी होत्या.
- 8 / 15
पहिला डोस दिल्यानंतर सर्वांच्या शरीरात SARS-CoV-2 स्पाइक प्रोटीनला ब्लॉक करणारे अँटीबॉडीज तयार झाले. स्पाइक प्रोटीनच मानवी पेशींमध्ये घुसखोरी करतो. त्यामुळे रुग्णाची प्रकृती ढासळू लागते.
- 9 / 15
व्हायरसला पेशींवर आक्रमण करण्यापासून रोखणाऱ्या अँटीबॉडीज तयार झाल्या. २८ दिवसानंतर दुसरा डोस दिला. त्यावेळी रोगप्रतिकारक शक्ती मोठया प्रमाणावर वाढली. नोव्हाव्हॅक्सचे हे संशोधन लवकरच मेडीकल जर्नलमध्ये प्रसिद्ध होईल.
- 10 / 15
सप्टेंबरच्या अखेरीस नोव्हाव्हॅक्सच्या तिसऱ्या फेजच्या चाचण्या सुरु होतील. २०२१ या वर्षात एक अब्ज ते दोन अब्ज लसीचे डोस बनवण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.
- 11 / 15
अमेरिकेने करोनावरील लस निर्मितीसाठी नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीला १.६ अब्ज डॉलर्सचा निधी देण्याची घोषणा केली होती.
- 12 / 15
नोव्हाव्हॅक्सची लस यशस्वी होणे, भारतासाठी सुद्धा आनंदाची बाब आहे. कारण नोव्हाव्हॅक्स बायोटेक या कंपनीने भारताच्या सिरम इन्स्टिटयूट ऑफ इंडियासोबत करार केला आहे.
- 13 / 15
या करारामुळे नोव्हव्हॅक्सच्या भारतातील लस उत्पादनाचे सर्वाधिकार सिरमकडे असणार आहेत. या करारामुळे सिरम भारतासाठी नोव्हाव्हॅक्सच्या लसीचे उत्पादन करणार आहे.
- 14 / 15
नोव्हाव्हॅक्स कंपनीने लस विकसित करताना कीटकामधील पेशींचा वापर केला आहे.
- 15 / 15
करोना व्हायरसला रोखणारी लस बनवण्यासाठी जगभरात १५० पेक्षा जास्त प्रकल्प सुरु आहेत.