‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ व ‘शिवा’ या मालिकांमधून अभिनेता शाल्व किंजवडेकर घराघरांत लोकप्रिय झाला. ‘येऊ कशी तशी…’मध्ये त्याने साकारलेलं ओम हे पात्र आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. छोट्या पडद्यावर शाल्वचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आता वैयक्तिक आयुष्यात अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

शाल्व किंजवडेकर-श्रेया डफळापुरकर गेली अनेक वर्षांपासून एकमेकांबरोबर आहेत. ते दोघेही एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. शाल्व-श्रेयाची जोडी प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय आहे. गेल्यावर्षी या दोघांनी थाटामाटात साखरपुडा केला होता. या दोघांच्या साखरपुड्याला कलाविश्वातील त्यांची बरीच मित्रमंडळी उपस्थित राहिली होती. आता ही जोडी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

हेही वाचा : नव्या मालिकांचा सपाटा! ‘कलर्स मराठी’ने केली नव्या मालिकेची घोषणा, जबरदस्त प्रोमो आला समोर

शाल्व-श्रेयाच्या साखरपुड्यानंतर त्यांच्या लग्नाची प्रचंड उत्सुकता चाहत्यांच्या मनात निर्माण झाली होती. अखेर नुकताच या दोघांच्या लग्नाचा मुहूर्त पार पडला आहे. यासंदर्भात श्रेयाने इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत माहिती दिली आहे. या फोटोला तिने मुहूर्त असं कॅप्शन दिलं आहे. आता येत्या काही दिवसांत शाल्व आणि श्रेया लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे. परंतु, दोघांनी अद्याप लग्नाच्या तारखेची अधिकृतपणे घोषणा केलेली नाही.

हेही वाचा : Video : ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट! चैतन्यचा ‘तो’ निर्णय ऐकताच अर्जुन-सायलीला बसला धक्का, नेमकं काय घडलं?

shreya
श्रेयाची इन्स्टाग्राम स्टोरी

दरम्यान, दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, शाल्व सध्या ‘शिवा’ मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. याशिवाय श्रेया डफळापुरकर सेलिब्रिटी स्टायलिस्ट म्हणून ओळखली जाते.