वरुण चक्रवर्ती प्रेयसीसोबत अडकला लग्नबंधनात
- 1 / 10
आयपीएलमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या वरुण चक्रवर्तीला यंदा भारताच्या टी-२० संघात स्थान मिळालं होतं.
- 2 / 10
मात्र, औस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होण्याआधीच वरुण चक्रवर्ती दुखापतीमुळे संघातलं आपलं स्थान गमावावं लागलं.
- 3 / 10
आयपीएल २०२० मध्ये केकेआर संघाकडून खेळणारा मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्ती प्रेयसीसोबत लग्नबंधनात अडकला आहे.
- 4 / 10
चेन्नई येथे वरुणचा विवाहसोहळा पार पडला.
- 5 / 10
वरुण चक्रवर्तीच्या विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अरुण कार्तिकने चक्रवर्तीला शुभेच्छा देत सोशल मीडियावर वरुणच्या लग्नातील फोटो पोस्ट केला आहे.
- 6 / 10
वरुण बद्दल महत्वाची बाब म्हणजे तो आधी वेगवान गोलंदाजी करत असे. पण त्यानंतर त्याने एका कारणामुळे फिरकी गोलंदाजीला पसंती दिली आणि याच फिरकीच्या जोरावर तो IPL मध्ये कोट्यवधींचा धनी ठरला.
- 7 / 10
वरुण हा तामिळनाडू संघाचा mystery spinner म्हणून ओळखला जातो. त्याने यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली.
- 8 / 10
१३ व्या वर्षांपासून तो क्रिकेट खेळत होता. पण महाविद्यालयामुळे त्याला क्रिकेट थांबवावे लागले होते. पदवीचे शिक्षण आणि दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्याने पुन्हा खेळायला सुरुवात केली होती. पण तेव्हा तो वेगवान गोलंदाज म्हणून खेळत होता. त्यानंतर मात्र गुढघ्याच्या दुखापतीमुळे त्याला फिरकी गोलंदाजीचा आधार घ्यावा लागला. पण हीच फिरकी गोलंदाजी त्याला कामी आली
- 9 / 10
आयपीएल २०२० मध्ये कोलकाता संघाकडून खेळताना वरुण चक्रवर्तीनं १३ सामन्यांत १७ विकेट घेतल्या आहेत.
- 10 / 10
चक्रवर्तीनं दुखपतीमुळे भारतीय संघात मिळालेली पहिली संधी गमावली आहे. मात्र, पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाच्या संघात स्थान मिळवण्याची संधी चक्रवर्तीकडे आहे. त्याशिवाय फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरोधाती सामन्यातही त्याला संधी मिळू शकते.