गणपती बाप्पा मोरया! पुण्यातल्या मानाच्या गणपतींची झाली प्रतिष्ठापना
- 1 / 10
पुणे : पुण्यातील पाचही मानाचे गणपती आणि अनेक वर्षांची परंपरा असलेल्या काही मंडळांच्या गणपतींची आज विधीवत प्रतिष्ठापना झाली. यंदा करोनाच्या संकटामुळे सार्वजनिक गणेश उत्सवांवर निर्बंध आले असून नियम व अटींसह उत्सवाला परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांनी यंदा कोणत्याही मान्यवरांना न बोलावता इतर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते एकमेकांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्याचा निर्णय घेतला आहे. (सर्व छायाचित्रे - सागर कासार)
- 2 / 10
मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीची प्रतिष्ठापना श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख हेमंत रासने यांच्या हस्ते झाली.
- 3 / 10
मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती मंडळाने यंदाही नेहमीप्रमाणे आकर्षक फुलांची आरास केली आहे. तांबडी जोगेश्वरी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना अखिल मंडई गणपतीचे अण्णा थोरात यांच्या हस्ते करण्यात आली.
- 4 / 10
दरवर्षीप्रमाणे यंदाही तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या आगमनानिमित्त विष्णूनाद शंख पथकाने शंखनाद केला.
- 5 / 10
मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती मंडळ ठरल्याप्रमाणे यंदा साधेपणाने उत्सव साजरा करणार आहे. गुरुजी तालीमच्या बाप्पाची प्रतिष्ठापना भाऊ रंगारी मंडळाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आली.
- 6 / 10
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडळाने यंदा साधेपणाने गणेशाची प्रतिष्ठापना केली. या बाप्पाची प्रतिष्ठापना केसरी वाडा गणपती ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते करण्यात आली.
- 7 / 10
मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीची नेहमीप्रमाणे केसरीवाड्यात साधेपणाने प्रतिष्ठापना करण्यात आली. केसरी वाडा गणपतीची प्रतिष्ठापना आणि आरती तुळशीबाग मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पार पडली.
- 8 / 10
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेटे यांच्या हस्ते पार पडली.
- 9 / 10
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या गणेशाची प्रतिष्ठापना गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते करण्यात आली.
- 10 / 10
अखिल मंडई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मंडळाच्या बाप्पाची प्रतिष्ठापना तांबडी जोगेश्वरी गणपतीचे अध्यक्ष राजाभाऊ टिकार यांच्या हस्ते करण्यात आली.