-
राजदीप सरदेसाई यांच्या वेगळ्या ओळखीची आज गरज नाही. पत्रकारितेच्या जगतात त्यांची मोठी ओळख आहे. त्यांनी आतापर्यंतच्या आपल्या कारकिर्दीत पद्मश्रीसहित अनेक पुरस्कार जिंकले आहेत. याव्यतिरिक्त त्यांनी काही पुस्तकंही लिहिली आहेत. पाहुयात राजदीप सरदेसाई यांचं घर आहे कसं. (सर्व फोटो – सागरिका घोष, फेसबुक)
-
राजदीप सरदेसाई हे १९९४ मध्ये पत्रकार सागरिका घोष यांच्यासोबत विवाह बंधनात अडकले.
-
सागरिका या अनेकदा सोशल मीडियावर आपल्या घरातील छायाचित्र शेअर करत असतात.
-
राजदीप सरदेसाई आणि सागरिका घोष यांना वाचनाची प्रचंड आवड आहे. त्यांच्याकडे अनेक पुस्तकं आहेत.
-
अनेकदा ते आपला वेळ घरात असलेल्या लायब्ररीतही घालवतात.
-
सागरिका आणि राजदीप सरदेसाई यांची दोन मुलं आहेत. मुलाचं नाव इशान तर मुलीचं नाव तारिणी आहे.
-
राजदीप सरदेसाई यांचे वडिल गोव्याचे होते. तर त्यांच्या आई या गुजराती होत्या.
-
राजदीप यांचा जन्म गुजरातमधील अहमदाबाद येथे झाला.
-
राजदीप सरदेसाई हे पत्रकारितेसोबतच उत्तम क्रिकेटपटूही आहेत.
-
ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेत असताना ते अनेक फर्स्ट क्लास मॅचही खेळले आहेत.
पत्रकाराबरोबरच उत्तम क्रिकेटरही आहेत राजदीप सरदेसाई; पाहा त्यांचं आलिशान घर
Web Title: Rajdeep sardesai wiki bio personal life see photos of lavish binglow of senior journalist and his wife sagarika ghose cricketer jud