
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या ‘सिल्व्हर ओक’वर शुक्रवारी दुपारी आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांनी धडक मोर्चा काढला होता.

यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या आणि जोरदार घोषणाबाजी केली.

शरद पवार यांचे हे घर मुंबईतील पेडर रोड येथे आहे. चला तर पाहूया शरद पवार यांच्या सिल्व्हर ओकचे काही खास फोटो…

मुंबईत मुख्यमंत्र्यांचा अधिकृत बंगला वर्षा, ठाकरे परिवाराचे निवासस्थान मातोश्री या बरोबरच राजकीय दृष्ट्या महत्वाचा बंगला म्हणजे पवारांचे निवासस्थान सिल्व्हर ओक.

बारामती जवळ असलेले काटेवाडी हे पवार कुटुंबियांचे मूळ गाव.

अगदी कमी वयात राजकारणात उतरून माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे मानसपुत्र म्हणून ओळख मिळवणाऱ्या शरद पवारांनी आपल्या कर्तबगारीने अगदी दिल्लीपर्यंत डंका वाजवला.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद आणि देशाचे संरक्षण मंत्रिपद भूषवले. गेल्या काही काळापासून त्यांनी आपले अधिकृत वास्तव्य मुंबईतील सिल्व्हर ओक येथे केले आहे.

सिल्व्हर ओक एका झाडाचं नाव असलं तरी महाराष्ट्रासाठी तो पवार साहेबांचा मुंबईतला बंगला म्हणून फेमस आहे.

दक्षिण मुंबईतील नेपियर सी रोड जवळ २२ हजार स्क्वेअर फूट इतकी पसरलेली सिल्व्हर ओक इस्टेट सोसायटी.

आज हे पवारांचं घर म्हणून ओळख मिळाली असली तरी ही एकेकाळी पारसी समुदायाची सोसायटी होती.

आज हजार करोड इतकी किंमत असलेली हि इस्टेट सोराबजी कांगा ट्रस्टच्या ताब्यात होती.

फक्त पारसी कुटूंबियांसाठी असलेल्या या सोसायटीमध्ये साधारण नव्वदच्या दशकात इतर समुदायातील लोकांना ही घर घेण्यास परवानगी मिळाली.

साधारण २०१३ साली तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी आपलं निवासस्थान सिल्वर ओक इस्टेट मधील बंगला क्रमांक २ इथे हलवले.

त्यानंतरही गेली अनेक वर्षे शांत निवांत उच्चभ्रू लोकांचा एरिया म्हणून ही ओळख बदलली नाही.

यापूर्वी ते पेडर रोड येथील रामालय या बंगल्यात राहायचे.

पवारांनी सिल्व्हर ओक येथे आपला पत्ता बदलला आणि मुंबईतील पॉलिटिकल पॉवर हाऊस म्हणून या भागाला ओळख मिळाली.

३००० हजार स्क्वेअर फूट इतका एरिया असलेल्या या दुमजली बंगल्यात शरद पवार वास्तव्य करतात.

सिल्व्हर ओकवर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी शरद पवार यांच्या भेटीसाठी जातात.

आमिर खानने देखील शरद पवारांची भेट घेतली होती.

शरद पवारांच्या लिव्हिंग रूममध्ये बैलाची एक पेन्टिंग देखील आहे.

त्यांच्या घरात राखाडी रंगाचे सोफे आहेत.

शरद पवार यांचा डायनिंग टेबल हा पांढऱ्या रंगाचा असून खुर्च्या या क्रिम रंगाच्या आहेत.

शरद पवार हे बऱ्याच वेळा त्यांच्या स्टडी रुममध्ये दिसतात.

शरद पवार यांच्यासोबत सुप्रिया सुळे बऱ्याचवेळा स्टडी रूममध्ये असतात.

याच स्टडी रूममध्ये बसून शरद पवार हे कॉन्फरन्स कॉल आणि ऑनलाइन मीटिंद देखील घेतात.

त्यांच्या स्टडी रूममध्ये ब्राऊन रंगाचे फर्निचर केले आहे.

शरद पवारांच्या घरी अनेक पेन्टिंग पाहायला मिळतात.

त्यांच्या घरात आणखी एक स्टडी रूम असल्याचे दिसते.

या रुममध्ये पांढऱ्या रंगाचे सोफे असून घोड्याची पेन्टिंग आहे.

. शरद पवारांच्या घराच्या खिडक्या या एका जुन्या वाड्याची आठवण करून देतात.

शरद पवार लेक सुप्रिया सुळेंचा वाढदिवस साजरा करताना.

शरद पवार यांच्या लिव्हिंग रूममध्ये लाकडाच्या खुर्च्या असून गॅलरीत अनेक झाड्यांच्या कुंड्या आहेत.

ममता बॅनर्जी यांनी सिल्व्हर ओकवर शरद पवारांची भेट घेतली होती.

ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांना भेट म्हणून दिला होता रविन्द्र नाथ टागोर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटो.

शरद पवार यांनी त्यांच्या स्टडी रूममध्ये त्यांच्या आईचा फोटो लावला आहे.

शरद पवारांच्या घरी अनेक वेळा राजकीय नेते भेट घेतात आणि तिथेच त्यांची बैठक होते.

शरद पवार यांच्या घराची एण्ट्रन्स ही लहान मुलांना कार्टूनमध्ये दिसणाऱ्या आकर्षक घरासारखी आहे.

लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळात शरद पवार हे लेक सुप्रिया सुळे आणि नातीसोबत बुद्धीबळाचा खेळ खेळताना दिसले. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.

राज ठाकरेंनी घेतली होती सिल्व्हर ओकमध्ये शरद पवारांची भेट.

संजय राऊत यांनी त्यांच्या कुटूंबासोबत घेतली होती शरद पवार आणि सुप्रिया सुळेंची भेट.

करोना काळात फ्रंटलाइन कामगारांनी लावली होती सिल्व्हर ओकला हजेरी.

पवार कुटूंब शरद पवारांचा वाढदिवस साजरा करताना. (All Photo Credit : Sharad Pawar/ Supriya Sule Instagram)