लोकसभा आणि ओडिशा विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाने ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाला मोठा धक्का दिला आहे. केंद्रपारा येथील लोकसभा खासदार आणि बीजेडीचा राजीनामा देणारे अभिनेते अनुभव मोहंती यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. चार वर्षांपासून पक्षात गुदमरल्यासारखे वाटत होते, असंही बीजेडी सोडताना मोहंती म्हणालेत. यापूर्वी शनिवारी अनुभव मोहंती आणि दोन माजी आमदारांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. चार वर्षांहून अधिक काळ बीजेडीशी जोडलेला आहे आणि आता गुदमरल्यासारखे वाटत होते. २०१४ मध्ये सर्वात तरुण राज्यसभा सदस्य बनलेले मोहंती २०१९ मध्ये केंद्रपारा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आलेत. त्यांनी नवी दिल्ली येथे पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे त्यांना पक्षात येण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ मध्ये मोहंती यांनी ओडिशातील भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत (जय) पांडा यांचा केंद्रपारा येथून १.५३ लाख मतांनी पराभव केला. पांडा यांना भाजपाने या जागेवरून उमेदवारी दिली आहे, तर मोहंती आता विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. दुसरीकडे बीजेडीने माजी आमदार राहिलेले अंशुमन मोहंती यांना लोकसभेचे उमेदवार घोषित केले आहे. जे अलीकडेच काँग्रेसमधून बाहेर पडले आहेत.

१ एप्रिल रोजी मोहंती यांनी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या उपस्थितीत येथील पक्ष मुख्यालयात पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे कौतुक करताना मोहंती म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत संसदेत तिहेरी तलाकची प्रथा बंद करणे आणि नवीन गुन्हेगारी कायदे आणणे यासह अनेक ऐतिहासिक विधेयके मंजूर झाल्याचे पाहून मला अभिमान वाटत आहे. या सरकारने अनेक धाडसी पावले उचलली असून, विकसित भारतासाठी लोकांनी मोदींना साथ दिली पाहिजे, असंही बीजेडी सोडताना मोहंती म्हणाले. भाजपामध्ये त्यांचे स्वागत करताना तावडे म्हणाले की, विरोधक एकत्र येऊन ताकद दाखवण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांना यश येत नाही. ज्यांना विकसित भारत बघायचा आहे ते सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देत आहेत. खरं तर मोहंती हे त्यांची अभिनेत्री पत्नी वर्षा प्रियदर्शिनीबरोबर दीर्घकाळ चाललेल्या वैवाहिक कलहात गुंतले होते, त्यामुळेच बीजेडीने गेल्या चार वर्षांपासून मोहंती यांना सर्व राजकीय हालचालींपासून धोरणात्मकदृष्ट्या बाजूला केले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ओडिशा उच्च न्यायालयाने त्यांचा घटस्फोट मंजूर केला आणि दीर्घकाळ सुरू असलेली ही कायदेशीर लढाई संपवली.

cm eknath shinde
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; भाजपच्या दबावामुळे उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचाः तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…

बेरहामपूरचे दोन वेळा खासदार असलेले एक लोकप्रिय अभिनेता आणि राजकारणी सिद्धांत मोहप्ता हेसुद्धा गेल्या आठवड्यात भाजपामध्ये सामील झालेत, तर कोरीचे माजी आमदार आकाश दास नायक या अभिनेत्यानेही भाजपात प्रवेश केलाय. दोघेही विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक आहेत. सिद्धांत आणि आकाश दोघांनीही बीजेडीने दुर्लक्ष केल्यामुळे भाजपात सामील झाल्याचे सांगितले. गेल्या महिन्यात लोकप्रिय अभिनेते अरिंदम रॉय हे पक्षातून बाहेर पडल्यानंतर बीजेडीमधून चित्रपट कलाकारांचे भाजपामध्ये येणे सुरू झाले. बीजेडीचे संघटनात्मक सचिव प्रणव प्रकाश दास यांचे मेहुणे असलेले रॉय यांना कदाचित तिकीट मिळणार नाही हे लक्षात आल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचे समजते. प्रादेशिक पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ज्येष्ठ अभिनेते प्रशांत नंदा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ ३ एप्रिल रोजी संपणार आहे, ते देखील बीजेडीमध्ये फारसे सक्रिय नाहीत. तर त्यांचा मुलगा ऋषभ २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपामध्ये सामील झाला आहे. २००० मध्ये भाजपाच्या तिकिटावर आणि २००९ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून बेगुनियामधून दोन विधानसभा निवडणुका जिंकलेल्या नंदावगळता दोन्ही वेळा बीजेडीबरोबर युतीमध्ये इतर कोणत्याही अभिनेत्याने ओडिशा विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाकडून विजय मिळवला नव्हता. सिद्धांत, अनुभव आणि आकाश या तिघांनीही बीजेडीच्या तिकिटांवर आपापल्या निवडणुका जिंकल्या होत्या.

हेही वाचाः काँग्रेसला ‘ठोसा’ देत ऑलिम्पिक पदकविजेत्या बॉक्सरचा भाजपाच्या तिकीटावर निवडणुकीच्या ‘रिंग’मध्ये प्रवेश; कारण काय?

२०१४ मध्ये काँग्रेसने लोकप्रिय अभिनेते बिजया मोहंती आणि अपराजिता मोहंती यांना अनुक्रमे भुवनेश्वर आणि कटक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली असली तरी दोघांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला. २०१९ मध्ये अपराजिता यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि भुवनेश्वर-उत्तरमधून निवडणूक लढवली, परंतु त्यांचा पुन्हा पराभव झाला. पक्षात लोकप्रिय चित्रपट कलाकारांच्या समावेशाबाबत भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की, या अभिनेत्यांचा मोठा चाहता वर्ग असल्याने २०२४ च्या निवडणुकीत पक्षाचा त्याचा फायदा होऊ शकतो.