लोकसभा निवडणुकीसाठी देशातील सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ३९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत केरळ, छत्तीसगड, कर्नाटक, मेघालय, सिक्कीम, तेलंगणा आणि त्रिपुरा या राज्यांतील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. या क्रमवारीत काँग्रेसने छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना छत्तीसगडच्या राजनांदगावमधून तिकीट दिले आहे. यापूर्वी गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीपर्यंत काँग्रेसला छत्तीसगडबद्दल अतिआत्मविश्वास होता की ते निवडणूक जिंकणार आहेत, पण निकाल काही वेगळेच लागले होते. तीन दशकांहून अधिक काळ भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातून पक्षाने बघेल यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता भाजपाच्या भूमिकेकडे पाहिले जात आहे. याआधीही माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांचे पुत्र अभिषेक सिंह आणि त्याआधी मधुसूदन यादव या मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास येथून भाजपाचे आमदार सातत्याने निवडणूक जिंकत आहेत. यावेळच्या निवडणुकीत रमण सिंह स्वतः येथील विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत.

२००० मध्ये राज्य स्थापन झाल्यापासून विधानसभा निवडणुकीत पुन्हा सत्तेवर आलेल्या भाजपाने एकदाच राजनांदगाव मतदारसंघ गमावला आहे. २००७ च्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या देवव्रत सिंग यांनी भाजपाच्या प्रदीप गांधी यांचा पराभव केला होता. मध्य प्रदेशातून छत्तीसगड वेगळे होण्याआधी राजनांदगाव हे मागील तीन निवडणुकांमध्ये १९८९, १९९६ आणि १९९९ मध्ये भाजपाने जिंकले होते, जेव्हा रमण सिंह यांनी काँग्रेसचे हेवीवेट नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल व्होरा यांचा पराभव केला होता. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राजनांदगावमधील भाजपा आणि काँग्रेसमधील मतांचे अंतरही वाढले आहे.

Mahavikas Aghadi, Bhiwandi
भिवंडीत महाविकास आघाडीत बंडखोरीची चिन्हे, मतदारसंघात पहिल्याच दिवशी ५४ अर्जांचे वितरण
Yavatmal Washim lok sabha election 2024 constituency overview Shinde group benefit or loss of changing candidates at last minute
मतदारसंघाचा आढावा : यवतमाळ-वाशीम- ऐनवेळी उमेदवार बदलण्याचा शिंदे गटाला फायदा की तोटा?
Ramtek Lok Sabha seat, rasmi barve Caste Certificate, Caste Certificate Controversy, raju parve Nomination Displeasure, favours congress, Challenges Shiv Sena, eknath shinde shivsena, lok sabha 2024, politics news, election news, marathi news
रश्मी बर्वे यांना मिळणाऱ्या सहानुभूतीमुळे शिवसेनेपुढे आव्हान; रामटेक लोकसभा मतदारसंघाचे चित्र
Ahmednagar, Shirdi, election, sujay vikhe patil,
नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र

हेही वाचाः काँग्रेस-आपचे मनोमीलन, पण नेत्यांचे काय? भारत जोडो यात्रेतच मतभेदांचे प्रदर्शन!

भाजपाकडून राजनांदगाव मतदारसंघात संतोष पांडे खासदार असून, त्यांना गेल्या वेळी ५०.७ टक्के मते मिळाली होती, तेच राजनांदगावमधून निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जातंय. छत्तीसगडमधील काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रबळ पक्षांबरोबर राज्यातील लोकसभा निवडणुकीतही अगदी विधानसभा निवडणुकांसारखीच दोघांमध्ये थेट लढत आहे. राजनांदगावमध्ये इतर अनेक पक्ष आणि अपक्षांनी त्यांचे नशीब आजमावले आहे, परंतु त्यातून फक्त १ टक्के मतं तिसऱ्या पक्षाने म्हणजे BSP ने मिळवली होती. शेवटच्या वेळी राजनांदगावमध्ये लोकसभेसाठी अटीतटीची लढत २००४ मध्ये झाली होती, ज्या वर्षी केंद्रात यूपीए I सरकार स्थापन झाले होते. त्यानंतरही भाजपाने चांगल्या फरकाने ही जागा जिंकली आहे. २०१९ मध्ये छत्तीसगड काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या मतांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली होती. २०१४ मध्ये लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार रमण सिंह यांचा मुलगा अभिषेक सिंह होता, तो ५४.६ टक्के मते मिळवून विजयी झाला होता. काँग्रेसचे उमेदवार कमलेश्वर वर्मा यांना ३४.६ टक्के मते मिळाली. २०१९ मध्ये भाजपाचे संतोष पांडे यांनी ५०.७ टक्के मते मिळविली, काँग्रेसचे भोला राम साहू यांना ४२.१ टक्के मते मिळाली.

आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघ जिंकून काँग्रेसचा दबदबा वाढला

खरं तर ओबीसींचे वर्चस्व असलेल्या या जागेवर जात हा प्रमुख घटक कधीच राहिलेला नाही. उदाहरणार्थ, रमणसिंग हे राजपूत आहेत, परंतु या जागेवर त्यांच्याबरोबरच २००४ मध्ये उच्चवर्णीय जातीचे असलेले नेते प्रदीप गांधी विजयी झाले होते. तसेच २००९ मध्ये मधुसूदन यादव विजयी झाले होते. तर २०१९ चे विजेते संतोष पांडे हे ब्राह्मण आहेत. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत संघर्ष करूनही राजनांदगाव लोकसभा मतदारसंघातील आठपैकी पाच विधानसभा मतदारसंघ जिंकून काँग्रेसचा दबदबा वाढल्याचं सांगितलं जाऊ लागलं.

पंडारिया, कावर्धा, खैरागड, डोंगरगढ, राजनांदगाव, डोंगरगाव, खुज्जी आणि मोहला मानपूर हे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. काँग्रेसने खैरागड, डोंगरगढ, डोंगरगाव, खुज्जी आणि मोहला मानपूर जिंकले, तर भाजपाला पंडारिया, कावर्धा आणि राजनांदगाव मिळाले. भाजपाने १.१ लाखांहून अधिक मतांच्या एकूण विजयाच्या फरकाने आपल्या तीन जागा जिंकल्या, तर काँग्रेसच्या पाच जागांवर विजयाचे अंतर एकूण ८० हजार मतांच्या आसपास होते, जे बघेल यांच्यासाठीही मोठे आवाहन होते. कवर्धा आणि पंडारियामध्ये दोन जागा असलेल्या कबीरधाम जिल्ह्यात २०२१ च्या जातीय दंगलीनंतर मतांचं ध्रुवीकरण झाले हा एक महत्त्वाचा घटक होता.

२०१४ मध्ये भाजपने छत्तीसगडच्या सर्व १० लोकसभेच्या जागा जिंकल्या होत्या. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या विरोधात सत्ताविरोधी लाट असताना काँग्रेसने या आठपैकी सहा जागा जिंकल्या होत्या आणि नंतर पोटनिवडणुकीत खैरागड जागा जिंकली होती. राजनांदगावमधून भाजपाचे रमण सिंग हे एकमेव विजयी झाले. पण पुन्हा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने १० पैकी ९ जागा जिंकून एक वेगळेच उदाहरण समोर ठेवले. बघेल हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीत दुसऱ्यांदा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. २००९ मध्ये त्यांची पहिली लढत रायपूरमधून होती, जिथे ते भाजपाचे विद्यमान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून ते पराभूत झाले. बघेल यांनी ४१.४ टक्के मते मिळवली. रायपूर जागेसाठी ३२ उमेदवार रिंगणात असताना तेव्हाही हे मैदान गजबजलेले होते. शेतकऱ्यांच्या निषेधासाठी ओळखल्या जाणाऱ्या राजनांदगावमध्ये नुकत्याच झालेल्या शेतकऱ्यांच्या निषेधामुळे पुन्हा एकदा भडकलेल्या शेतकऱ्यांमधील काही भाजपाविरोधी भावनांचा फायदा बघेल यांना होण्याची आशा आहे. राज्यात त्यांच्या सरकारच्या एमएसपी आणि कर्जमाफीच्या धोरणांमुळे बघेल यांनी शेतकरी समर्थक चेहरा म्हणून प्रतिमा तयार केली आहे.