भाजपाने माजी केंद्रीय मंत्री आणि दिवंगत भाजपा नेत्या सुषमा स्वराज यांच्या कन्या बन्सुरी स्वराज हिला नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातील प्रचारातही बन्सुरी सक्रिय दिसत आहे. माझ्यावर सुषमा स्वराज यांचे संस्कार आहेत, मी तुम्हाला कधीही निराश करणार नाही,” असं ४० वर्षीय बन्सुरी स्वराज म्हणाली आहे. नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून भाजपाची उमेदवार म्हणून बन्सुरी पहिल्यांदाच निवडणूक लढवत असून, प्रचारादरम्यान प्रत्येक भाषणात तिने आपल्या दिवंगत आईला साद घालण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझ्या आईची मुलगी असून, माझ्या मूल्यांना आणि कार्य नैतिकतेला आकार देण्यासाठी आईच्या प्रभाव फायदेशीर ठरला आहे, असंही इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना बन्सुरी हिने सांगितले. मी राजकारणातील प्रवेशाबाबत कधीही कोणाशी चर्चा केली नसल्याचेही ती सांगते. “माझी आई आणि मी माझ्या राजकारणातील प्रवेशाबद्दल कधीही चर्चा केली नव्हती, परंतु आम्ही माझ्या कायदा क्षेत्रातील प्रवेशाबद्दल खूप चर्चा केली, कारण त्या वेळी राजकारणात येण्याचा माझा कोणताही इरादा नव्हता,” असंही तिने सांगितले.

“लोकांची माझ्या आईप्रति असलेली आपुलकी पाहून मी खूप कृतज्ञ आहे. त्यांचे तिच्यावरील प्रेमच माझ्यावर आशीर्वादाचा वर्षाव करीत आहेत. माझी आई करुणेची व्यक्तिरेखा होती, तिने परदेशात अनेक भारतीयांना मदत केली. २०१९ मध्ये ती सरकारमध्ये नसतानाही तिने करुणा सोडली नाही. मला याचा खरोखर अभिमान आहे,” असंही बन्सुरीने अधोरेखित केले. विशेष म्हणजे बन्सुरी यांना भाजपाच्या दोन वेळा नवी दिल्लीच्या खासदार राहिलेल्या मीनाक्षी लेखी यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली आहे. २०१९ च्या निवडणुकीत लेखी यांनी मतदारसंघात मतदान झालेल्या ९.१९ लाख मतांपैकी जवळपास ५५ टक्के मते मिळवली होती, ज्यामध्ये मालवीय नगर, ग्रेटर कैलाश, पटेल नगर, मोती नगर, करोल बाग आणि आर. के. पुरम यांसारख्या भागांचा समावेश आहे. काँग्रेसचे अजय माकन आणि आपच्या उमेदवार ब्रिजेश गोयल यांचा पराभव केला होता.

खरे तर नवी दिल्ली मतदारसंघातील काही भाग आधी दक्षिण दिल्ली लोकसभा मतदारसंघात समाविष्ट करण्यात आला होता, जिथून १९९६ मध्ये सुषमा स्वराज विजयी झाल्या होत्या. निवडणुकीसाठी एका महिन्याहून कमी कालावधी शिल्लक असताना २५ मे रोजी या मतदारसंघात मतदान होणार आहे. बन्सुरी हिचा प्रचारासाठी दिवस सकाळी लवकर सुरू होतो आणि त्या संध्याकाळपर्यंत अनेक रोड शो करते. सब्जी मंडई आणि चौपालांपासून धोबीघाट आणि झोपड्यांपर्यंत ती आपल्या मतदारसंघात छोट्या सभांना संबोधित करते. तिने मनोहर पार्क ते सुभाष चौकापर्यंतचा परिसर व्यापून टाकला होता. तिच्या जनसंपर्क यात्रेसाठी तिने मिनी ट्रकवर बसून सकाळी ८ वाजता तिचा रोड शो सुरू केला. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता तो रोड शो आयआयटी-दिल्ली समोरील एसडीए बाजारामध्ये आला. या गर्दीत २३ वर्षीय अभिषेक त्यागी हा आयआयटी दिल्लीचा विद्यार्थ्यानेही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तो म्हणाला, सुषमा स्वराज यांच्या मुलीला पाहण्याची मला उत्सुकता होती.

हेही वाचाः खलिस्तानसमर्थक अमृतपाल सिंग तुरुंगातून निवडणूक लढवू शकतो का?

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (ABVP) च्या कार्यकर्तीपासूनच्या तिच्या प्रवासाबद्दलही तिने सांगितले. मी भाजपाची कार्यकर्ती असले तरी मी अचानक राजकारणात येण्याचा निर्णय घेतला. मी वकील म्हणून एक दशकाहून अधिक काळ पक्षाची सेवा करीत होते; मग मला पक्षाच्या दिल्ली युनिटकडून फोन आला की ते कायदेशीर सेल वाढवत आहेत आणि मला त्यात नेतृत्वाची भूमिका करायची आहे का ते विचारले. नंतर मला दिल्ली भाजपामध्ये सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली, असंही बन्सुरी यांनी द इंडियन एक्सप्रेसला सांगितले.

२ मार्च रोजी मी माझ्या वडिलांबरोबर दूरदर्शन पाहत असताना मला अचानक समजले की, पक्षाने माझ्यावर नवी जबाबदारी सोपवली आहे. प्रेम, आशीर्वाद आणि आपुलकीबद्दल मी दिल्लीच्या लोकांची आभारी आहे. त्यांचा नरेंद्र मोदींच्या प्रशासनावरचा विश्वास दिसून येत असल्याचंही तिने सांगितले.

हेही वाचाः कलम ३७० वर काँग्रेसचे मौन तरीही आम्ही समजून घेतोय; ओमर अब्दुल्लांचं विधान

मोदी सरकारच्या अनेक योजना ती आपल्या जाहीर भाषणात मांडते. मोदी सरकारच्या काही अत्यंत महत्त्वाच्या योजना आहेत, ज्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दिल्लीत होऊ देत नाहीत. उदाहरणार्थ, ५ लाख रुपयांचे आरोग्य सुरक्षा देणारी आयुष्मान भारत योजना दिल्लीत लागू केली जाऊ शकत नाही, कारण ते त्यास परवानगी देत नाहीत. सर्व मोदी प्रशासनाच्या योजना अंमलात आणल्या जातील, असं ती नवी दिल्ली रेल्वे स्थानकाजवळील सब्जी मंडी येथे भाषणात म्हणाली. आठवड्याच्या सुरुवातीला मोती नगर येथे भाजपाच्या शीख समाजाच्या मेळाव्याला संबोधित करताना तिने पुन्हा आपल्या दिवंगत आईला साद घातली. दिल्ली की कुडी अशी स्वतःची ओळख करून देत ती म्हणाली, मी मागच्या जन्मी काही तरी पुण्याचे काम केले होते म्हणून मला या जन्मी स्वराज कौशल आणि सुषमा स्वराज यांच्या स्वरूपात आई-वडील मिळाले. तिने उच्च शिक्षण परदेशात घेतले असेल तरी तिचे हृदय हिंदुस्थानातच असल्याचे ती सांगते.