वाशीम : जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघ हा भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचा गड. मात्र, नुकत्याच झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार प्रकाश डहाके यांच्या पत्नी सई डहाके यांनी सर्वच्या सर्व १८ संचालक निवडून आणत या गडाला सुरुंग लावला. भाजपचे प्राबल्य असलेल्या मतदारसंघात आजही ‘डहाके पॅटर्न’चीच हवा असल्याचे यामुळे अधोरेखित झाले.

खरेदी विक्रीपाठोपाठ बाजार समितीमधील पराभव आ. पाटणींसाठी धोक्याची घंटा असून भाजपला आपला गड राखणे कठीण जाणार असल्याचे संकेत यातून मिळत आहे. कारंजा विधानसभा मतदारसंघ वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात मोडतो. भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष पाटणी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. माजी आमदार दिवंगत पकाश डहाके यांचा अपवाद वगळता या मतदारसंघाचे बाहेरील उमेदवारानेच प्रतिनिधित्व केल्याचा इतिहास आहे. आ. पाटणी मतदारसंघाबाहेरील उमेदवार असले तरी त्यांनी दोन वेळा या मतदारसंघात विजय मिळवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांनी उडी घेतली होती. मात्र, सई डहाके यांनी या निवडणुकीत १८ पैकी १८ संचालक निवडून आणत त्यांना जोरदार धक्का दिला. यामुळे ग्रामीण भागात भाजपला मोठा फटका बसला.

Chandrakant Patil, shivsena candidate,
मागील विधानसभा निवडणुकीत कोल्हापुरातील शिवसेनेचे उमेदवार पाडण्यात चंद्रकांत पाटलांचा हात; भाजपच्या माजी नगरसेवकाचा गौप्यस्फोट
Tanaji Sawant, Archana Patil, Tanaji Sawant silence,
अर्चना पाटील उमेदवारीनंतर समर्थकांच्या आंदोलनावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे मौन
Prime Minister Narendra Modis meeting in Baramati Lok Sabha Constituency
‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?
Chandrashekhar Bawankule
औषधी संचावर पंतप्रधानांचा फोटो का नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पुण्यातील पदाधिकाऱ्यांना प्रश्न

हेही वाचा – नंदुरबारमध्ये भाजप-शिंदे गटातील वादाचा काँग्रेसला लाभ

प्रकाश डहाके राष्ट्रवादीचे आमदार होते. माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे ते नातेवाईक. जिल्ह्याच्या राजकीय पटलावर ‘दादा’ म्हणून त्यांची ख्याती होती. परंतु त्यांच्या निधनानंतर या मतदारसंघात राजकीय पोकळी निर्माण झाली. ही पोकळी भरून काढण्यासाठी काही नेत्यांनी राजकीय गणिताची फेरमांडणी केली. सई डहाके यांनी बाजार समिती निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय पदार्पण केले आणि पदार्पणालाच विजय मिळवत आ. पाटणी आणि भाजपला धक्का दिला. कारंज्याच्या राजकीय आखाड्यात आगामी निवडणुकांमध्ये डहाकेंना डावलून चालणार नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

विधानसभा निवडणुकीची गणिते बदलणार?

कारंजा विधानसभा मतदारसंघात मानोरा व कारंजा हे दोन तालुके येतात. पाटणी यांनी एकदा शिवसेनेच्या तिकिटावर विजय संपादन केला होता. त्यानंतर ‘मोदी लाटेत’ त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि जिल्हाध्यक्षपदासह आमदारकी मिळवली. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपकडून पाटणी हेच उमेदवार असतील, अशी दाट शक्यता आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी कारंजा विधानसभा लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. प्रकाश डहाके यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक जिंकली होती. आता राष्ट्रवादीकडून सई डहाके यांच्या नावावार शिक्कामोर्तब होऊ शकते. असे झाल्यास या मतदारसंघातील राजकीय गणिते बदलू शकतात.

हेही वाचा – नामांतराने नगरची सामाजिक समीकरणे बदलणार ?

पुंजानींमुळे राष्ट्रवादीच्या ताकदीत भर

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पाटणी यांना ७३ हजार २०५ मते पडली होती. प्रकाश डहाके यांना ५० हजार ४८१ मते मिळाली होती, तर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी नाकारल्यामुळे ऐनवेळी बसपाकडून मैदानात उतरलेले युसूफ पुंजानी यांनी ४१ हजार ९०७ मते घेतली होती. आता पुंजानी आणि डहाके एकत्र आल्यामुळे राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे.