धुळे : तब्बल ५० वर्षे अधिराज्य केल्यावर काँग्रेसच्या ताब्यातून निसटलेल्या धुळे लोकसभा मतदारसंघावर मागील गेल्या १५ वर्षांपासून भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आगामी निवडणुकीतही विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी भाजपकडून धार्मिक कार्यक्रमांवर जोर देण्यात येत असताना, दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मात्र मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला राहील की राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार यावरच वाद सुरु आहेत. सलग दोनवेळा विजयी होऊनही भाजप विद्यमान खासदार डाॅ. सुभाष भामरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

स्वातंत्र्यानंतर लोकशाही आणि समाजवादासह धर्मनिरपेक्ष विचारसरणी तोलून धरत १९५२ ची पहिली निवडणूक काँग्रेसच्या शालीग्राम भारतीय यांनी जिंकली होती. दुसऱ्या निवडणुकीत १९५७ मध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीच्या माध्यमातून धुळे लोकसभेची जागा जनसंघाच्या वाट्याला आली. जनसंघातर्फे उत्तमराव पाटील यांनी विजय संपादन केला खरा, पण पुढे जनसंघाची विचारधारा या मतदार संघावर प्रभाव पाडू शकली नाही. जनसंघाच्या नेतृत्वाला दूर करत काँग्रेसने पुढील ५० वर्षे हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला. १९९९ च्या निवडणुकीत रामदास गावित हे भाजपतर्फे निवडून आले. नंतर २००४ मध्ये बापू चौरे यांनी काँग्रेसला पुन्हा हा मतदारसंघ मिळवून दिला. त्यानंतर भाजपने मोठ्या प्रमाणावर हिंदुत्वाची पाठराखण सुरु केल्याचा प्रभाव धुळे मतदारसंघावरही पडला. प्रतापराव सोनवणे हे भाजपचे उमेदवार निवडून आले. त्यानंतर मागील दोन निवडणुकांमध्ये माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे हे विजयी झाले. पहिल्या वेळी डाॅ. भामरे यांनी काँग्रेसच्या अमरिशभाई पटेल यांसारख्या बलाढ्य उमेदवाराचा पराभव केला होता. सध्या तेच अमरिशभाई भाजपमध्ये आहेत. एकेकाळी देशात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापेक्षा अधिक मतांनी निवडून आल्यामुळे धुळे मतदारसंघातील दिवंगत चुडामण पाटील यांचे नाव झाले होते. सलग तीन पंचवार्षिक निवडणुकांत त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखले होते.

BLO alleges that BJP MLAs office bearers are making rounds in the polling stations
भाजप आमदार, पदाधिकाऱ्यांच्या मतदान केंद्रात येरझारा; बीएलओचा आरोप, व्हिडीओ व्हायरल
Shindesena, thane,
शिंदेसेनेचे ठाण्यात पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन
Jalna lok sabha election २०२४, congress, Dr kalyan kale
डॉ. कल्याण काळे यांच्या उमेदवारीने जालन्याची लढत आता लक्षवेधक ठरणार
Eknath Shindes Shiv Senas claim on Bhiwandi Lok Sabha
भिवंडी लोकसभेवर शिंदेच्या शिवसेनेचा दावा, कल्याणचे पडसाद भिवंडीत

हेही वाचा : शर्मिला आता आंध्र प्रदेश काँग्रेसच्या प्रमुख, पण स्थानिक नेत्यांचा पाठिंबा मिळणार का? पक्षाचा विस्तार करण्यात यश येणार?

धुळे लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या मालेगाव मध्य, मालेगाव बाह्य, बागलाण, धुळे शहर, धुळे ग्रामीण आणि शिंदखेडा या सहा विधानसभा मतदार संघांपैकी मालेगाव मध्य तसेच धुळे शहर या दोन विधानसभा मतदारसंघात एमआयएमचे आमदार आहेत. धार्मिक धुव्रीकरणाच्या राजकारणामुळे भाजपला लोकसभा मतदारसंघात यश मिळत असले तरी अल्पसंख्यांकांची अधिक संख्या असलेल्या धुळे शहर आणि मालेगाव शहर या दोन विधानसभा मतदारसंघात भाजपविरोधी एकगठ्ठा मतदान झाल्याने एमआयएमसारख्या कट्टर धार्मिक पक्षाचे फावले. त्यामुळेच लोकसभा निवडणुकीत उमेदवारीसाठीही त्यांच्याकडून हालचाली सुरु झाल्या आहेत.

भामरे यांची अस्वस्थता वाढली

भाजपच्या ताब्यात १५ वर्षांपासून धुळे मतदारसंघ असतानाही विकास कामांवर मते मागण्यापेक्षा त्यांचा भर शिवकथापुराण, धर्म जागरण सभा, कलश यात्रा, हिंदुराष्ट्र दिन, श्रीराम मंदिर प्रतिकृती शोभायात्रा, हिंदू जनजागरण यात्रा, पांझरा नदीपात्रात श्रीराम मंदिराची भव्य आरास उभारणी, रुद्राक्ष वाटप अशा धार्मिक कार्यक्रमातून बहुसंख्यांकांना आकर्षित करण्यावरच राहिला आहे. धुळे मतदारसंघातून विद्यमान खासदार डाॅ. सुभाष भामरे यांनी पुन्हा एकदा भाजपची उमेदवारी गृहित धरुन प्रचाराला सुरुवात केली असली तरी, उमेदवारीच्या अपेक्षेने पक्षात आलेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रतापराव दिघावकर यांनीही काही महिन्यांपासून गावोगावी संपर्क सुरु केल्याने भामरे यांची अस्वस्थता वाढली आहे. भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाच्या उमेदवार निवडीतील धक्कातंत्राचीही त्यांना धास्ती असणार. दुसरीकडे, महाविकास आघाडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनीही मतदारसंघावर दावा सांगितला आहे. काँग्रेसचा सलग तीनवेळा पराभव झाल्याने राष्ट्रवादीने मतदारसंघ आपल्यासाठी सोडण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : काँग्रेसच्या कार्यपद्धतीवरून मिलिंद देवरांची सडकून टीका; म्हणाले, “मला एका वरिष्ठ नेत्याचा फोन आला अन्…” 

धुळे लोकसभा मतदार संघात आजपर्यंत काँग्रेसने १० वेळा आणि भाजपने पाच वेळा विजय मिळवला आहे. एकदा जनसंघाने ही जागा जिंकली होती. सद्यस्थितीत धुळे लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांमध्ये धुळे शहर एमआयएम, धुळे ग्रामीण काँग्रेस, शिंदखेडा भाजप, मालेगाव मध्य एमआयएम, मालेगाव बाह्य शिवसेना, बागलाण भाजप असे चित्र आहे.

मागील निवडणुकीत प्रमुख उमेदवारांना मिळालेली मते

१) डाॅ. सुभाष भामरे (भाजप) – ६,१३,५३३

२) कुणाल पाटील (काँग्रेस) – ३,८४,२९०